Avinash Sachdev | अविनाश सचदेव याने केले रुबिना दिलैक हिच्याबद्दल मोठे विधान, थेट म्हणाला, प्रत्येक नात्यामध्ये

0
127
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबई : टीव्ही अभिनेता अविनाश सचदेव (Avinash Sachdev) हा बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाला होता. विशेष म्हणजे अविनाश बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरातून बाहेर पडल्यापासून सतत मुलाखती देताना अविनाश सचदेव हा दिसत आहे. विशेष म्हणजे या मुलाखतींमध्ये मोठे खुलासे करताना अविनाश सचदेव हा दिसत आहे.

 

बिग बाॅसच्या घरात अविनाश सचदेव आणि पलक नाज यांचे एक वेगळे रिलेशन बघायला मिळाले. इतकेच नाही तर बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अविनाश सचदेव आणि पलक नाज डेटवर देखील गेले होते. अविनाश सचदेव याने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे.सचदेव हा धमाकेदार गेम खेळताना बिग बाॅसच्या घरात दिसला. मात्र, काही दिवसांपूर्वीच तो बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडला आहे.

विशेष म्हणजे अविनाश सचदेव याची मोठी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर देखील बघायला मिळते. अविनाश सचदेव आणि टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले होते. मात्र, अचानकपणे यांचे ब्रेकअप झाले. ज्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.

 

मुळात म्हणजे चाहत्यांना अविनाश सचदेव आणि रुबिना दिलैक यांची जोडी प्रचंड आवडत असे. चाहते यांच्या लग्नाची देखील वाट पाहत असताना यांचे ब्रेकअप झाले. अविनाश सचदेव याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रुबिना दिलैक हिने काही वर्षे अभिवन शुक्ला या डेट केले आणि त्याच्यासोबत लग्न केले.

 

आता नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अविनाश सचदेव हा रुबिना दिलैक हिच्याबद्दल बोलताना दिसला. इतकेच नाही तर बालपणीचे प्रेम असल्याचे त्याने म्हटले. अविनाश सचदेव हा रुबिना दिलैक आणि त्याच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलताना दिसला. अविनाश सचदेव म्हणाला, खरोखरच तो काळ खूप जास्त चांगला होता.

मी आणि रुबिना दिलैक दोघेही टीव्ही क्षेत्रामध्ये नवे होतो आणि आमच्यामध्ये प्रेम होणे साहजीकच होते. त्यावेळी आमचे वय देखील खूप जास्त कमी होते. आता त्याचा विचार केला तर ते आमचे बालपणीचे प्रेम होते. मुळात म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी ही कायमच ठरलेली असते. जेवढा काळ आम्ही एकत्र जगलो तोच आमचा वेळ होता. प्रत्येक गोष्ट थोडी आयुष्यभराची असते. नात्यामध्येही एक्सपायरी ठरलेली असते. आता अविनाश सचदेव याच्या या विधानाची चर्चा रंगताना दिसत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here