Video: … जेव्हा धोनी रस्त्यावर गाडी थांबवून विचारतो पत्ता; वाटसरु चाहत्यांना सुखद धक्का

0
153
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

रांची – टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचा आवडता क्रिकटर्स म्हणजे एम.एस. धोनी. एका सर्वसामान्य कुटुंबातून धोनीने कष्टाच्या आणि सातत्याच्या जोरावर जगभरात स्वत:चं आणि देशाच्या क्रिकेटचा नावलौकीक केला.

त्यामुळेच, धोनीची एक झलक पाहण्यासाठी, धोनीसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहते प्रयत्नांची पराकाष्टा करतात. मात्र, तुम्ही रस्त्यात चालत आहात अन् अचानक धोनी येऊन तुम्हाला पत्ता विचारतो तेव्हा काय होई. रांचीच्या रस्त्यावर असाच प्रकार धोनीच्या दोन चाहत्यांसोबत घडलाय.

धोनीचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात, कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारील सीटवर बसलेला धोनी रस्त्यात गाडी थांबवून वाटसरुंना पत्ता विचारत आहे. धोनीचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना आनंद झालाय, माहीने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत. कारण, या व्हिडिओतील धोनीला पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीचा आनंद गगनात मावेना झालाय. धोनीला अचानक पाहून तो अचंबित झाला आहे. तर, धोनीला पत्ता सांगताना तो त्याच्यासमवेत फोटोही काढताना दिसून येतो.

धोनी अतिशय शांत आणि सहजपणे या वाटसरुंशी बोलताना दिसून येतो. अगदी मित्रांनी गप्पा माराव्यात अशारितीने धोनीचा हा अंदाज व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा धोनीच्या चाहत्यांनी आपला माही म्हणजे डाऊन टू अर्थ… भारीमाणूस पण साधामाणूस असं म्हटलंय. सीएसके ऑफिशीयल फॅन या इंस्टा अकाऊंटवरुन धोनीचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. विशेष म्हणजे इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

दोघांमधील संवाद

चाहते – गोल चक्कर आएगा, फिर वहाँ से रांची चला जाएगा

धोनी – कौन सा? सेकंड मूर्तीवाला गोलचक्कर?

चाहते – हाँ

धोनी – ठीक है, फिर चलते है

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here