बीड मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला निघालेल्या सुमंत रुईकर यांचा वाटेतच म्रत्यू

spot_img

बीड : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी बीडमधील शिवसैनिक सुमंत रुईकर तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी पायी निघाले होते.

त्यांनी यासाठी 1100 किलोमीटर पायी जाण्याचा निश्चय केला होता. एक डिसेंबर पासून तिरुपतीच्या वाटेवर निघाले खरे पण वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यापूर्वी 2019 मध्ये ही उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आहे. सुमंत रुईकर यांनी बीड ते तिरुपती बालाजीची पायी यात्रा पूर्ण केली होती. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी सुमंत रुईकर यांच्या निष्ठेचे कौतुक सुद्धा केले होता आणि त्याचा सत्कार देखील केला होता.

सुमंत रुईकर आणि त्यांचा मित्र शुभम जाधव यांचं दोघे रोज 35 किलोमीटर पायी चालत 31 डिसेंबरपर्यंत त्यांना तिरुपती बालाजीला पोहोचायचे नियोजन होते. शनिवारी ते कडप्पापर्यंत पोहोचले. पण रोज तीस-पस्तीस किलोमीटर चालण्यामुळे सुमंत रुईकर थकले होते. त्यातच त्यांना ताप आला. त्या अवस्थेत देखील त्यांना पुढे जायचे होते. त्यांच्या मित्राने हे घरी कळवले आणि घरच्यांनी त्यांना परत येण्याची विनंती सुद्धा केली होची मात्र त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही.

घरच्यांनी विनंती केली, मित्रांनीही त्यांना पुढे जाण्यापासून थांबवलं. अखेर कशीबशी सुमंत यांची समजूत घालण्यात आली. परत येण्यासाठी कडप्पामधून रेल्वेत बसून ते बीडला परत येण्यासाठी निघाले. मात्र सोलापूर येण्याआधीच सुमंत रात्रीच तेलंगणा राज्यातील रायचूर स्टेशनवर उतरले आणि एकटेच पुन्हा तिरुपतीकडे निघाले.

अंगात ताप होता, पायात त्राण नव्हता तरी ते चालत राहिले आणि रायचूरपासून तिरुपतीच्या दिशेने 20 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला कोसळले. दरम्यान घरची मंडळी मित्र सतत फोन करत होते. रिंग जात होती पण फोन उचलला जात नव्हता. अखेर घरच्या मंडळींनी बीडच्या पोलिसात धाव घेतली आणि हरवल्याची नोंद केली.

अखेर मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी सुमंत रुईकर यांचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यावर रायचूरचा पत्ता मिळाला बीडहून सुमन तोडकर यांचे मित्र मंडळ रायचूरला पोहोचले. दरम्यान सुमंत तिथे बेशुद्ध अवस्थेत पडले होते. रायचूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, तोपर्यंत त्याच प्रकृती खालावली होती. अखेर सुमंत रुईकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुमंत रुईकर यांच्या पश्चात पत्नी वडील आणि दोन मुलं आहेत.

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले उपचारादरम्यान तीचा मृत्यू , तो गंभीर…

केरळ : स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना केरळमध्ये सोमवारी (19 फेब्रुवारी) घडली आहे. यात पीडित 32 वर्षीय महिलेचा...

VIDEO : भारतात अवघ्या १० रुपयांना मिळणारा कढीपत्ता कॅनडात मिळतोय ‘इतक्या’ रुपयांना

भारतीय मसाल्याच्या पदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ आहे कढीपत्ता . खाद्यपदार्थाला स्वाद येण्यासाठी आपण फोडणीत त्याचा आवर्जून वापर करतो. त्यामुळे भारतातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये तुम्हाला कढीपत्त्याचा...

पोलीस ठाण्यातच निरीक्षकाने डोक्यात झाडून घेतली गोळी

नाशिक : येथील अंबड पोलिस ठाण्यातील गुन्हेशोध शाखेचे पोलीस निरीक्षकांनी मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेनऊ-पावणे दहाच्या सुमारास केबिनमध्ये स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून डोक्यात गोळी झाडून...

मनोज जरांगेंनी उपचार थांबवले, पुन्हा तीव्र उपोषण सुरु; विधेयक मंजूर झाल्यानंतर म्हणाले..

अंतरवाली सराटीः मराठा आरक्षणासाठी मंगळवारी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं होतं. अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत स्वतंत्र आरक्षण...

मेंदीचे खुनी हात,लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरीने घेतला पतीचा जीव..

लखनऊ : हत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मऊ येथे खुनाची ही खळबळजनक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका...