21.3 C
New York
Tuesday, April 30, 2024

Buy now

मुलीला प्रियकराने रात्री मंदिरात बोलावलं, सकाळचं दृश्य पाहून सगळे हादरले

- Advertisement -

मुली व महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रोज कोणत्या ना कोणत्या शहरातून बलात्काराच्या बातम्या समोर येत असतात. आता सातवीत शिकणाऱ्या एका मुलीची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

या मुलीचा मृतदेह गावातल्या मंदिराजवळ आढळला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. मुलीचा खून तिच्या प्रियकरानेच केला असावा, असं म्हटलं जात आहे. याबाबत पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. ही घटना झारखंडच्यागढवा जिल्ह्यात घडली आहे.

- Advertisement -

झारखंडमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झारखंडच्या गढवा जिल्ह्यात भंडारिया पोलीस स्टेशन हद्दीतल्या मर्दा गावात ही घटना घडली आहे. गावातल्या एका मंदिराजवळ सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला आहे. अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करून तिचा मृतदेह मंदिराजवळ फेकून दिल्याचा संशय आहे.

सोमवारी भंडारिया पोलिसांनी नवाका गावातील प्रभन मंदिराजवळून सातवीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी गढवा इथं पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थिनीचा कथित प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. तिचा कथित प्रियकर भेजारिया गावातील रहिवासी पितरूस सिंह हा आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. पितरूस याने या अल्पवयीन मुलीला खरंच मारलं का, तिच्याबरोबर दुष्कृत्य केलं का, या संदर्भातली माहिती मिळण्यासाठी पोलीस चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कथित प्रियकर पितरूस सिंहने उत्क्रमित मिडल स्कूलमध्ये सातव्या वर्गात शिकणाऱ्या त्याच्या प्रेयसीला रात्री 11 वाजता मंदिराजवळ भेटण्यासाठी बोलावलं होतं. त्याने तिच्याशी गैरवर्तन करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपी प्रियकराने प्रेयसीला मारल्यानंतर तिचा मृतदेह तिच्या नवीन घराच्या व्हरांड्यात ठेवला आणि प्रेयसीच्या कुटुंबीयांनाही याची माहिती दिल्याचं म्हटलं जात आहे. खुनाच्या या धक्कादायक घटनेनंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles