Gadar 2 आणि OMG 2 ची बॉक्स ऑफिसवर टक्कर; कोण कमावणार किती पैसे?

0
75
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबई : बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा दोन ब्लॉकबस्टर होण्याची शक्यता असलेले सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले आहेत. अभिनेता सनी देओलचा ‘गदर 2’ आणि अक्षय कुमारचा ‘ओएमजी 2’ हे दोन्ही आज म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात रिलीज झाले आहेत.

दोन्ही सिनेमांसाठी प्रेक्षक उत्सुक होते. हे दोन्ही सिनेमे पहिल्या सिनेमाचा सिक्वेल आहेत. थिएटरमध्ये आता नेमका कोणता सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी सर्वाधिक गर्दी केली आहे. दोन्ही सिनेमांचे लेटेस्ट अपडेट काय आहेत?

पाहूयात.बॉलिवूडमध्ये 2 बिग बजेट, तगडी स्टारकास्ट असलेले सिनेमे एकाच दिवशी होण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. या आधीही स्वातंत्र्य दिनाच्या आठवड्यात आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ आणि अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हा सिनेमा रिलीज झाला होता. दरम्यान दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. दोन्ही सिनेमे 100 कोटी पर्यंत देखील पोहोचू शकले नाहीत.हेही ‘अक्षय कुमरला जो घालेल चपलची माळ त्याला 10 लाख देणार’, राष्ट्रीय हिंदू परिषद भारतकडून ‘OMG 2’ चा जाहीर निषेधमागील वर्षी ईदच्या मुहूर्तावर अजय देवगणचा ‘रनवे 34’ आणि टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती 2’ असे दोन सिनेमे आमने सामने आले होते.

तर 2022च्या दिवाळीत अक्षय कुमारचा ‘रामसेतु’ आणि अजय देवगणचा ‘थँक गॉड’ बॉक्स ऑफिसवर आमने सामने आले होते. या चारही सिनेमांना ईदच्या मुहूर्तावर रिलीज होण्यास नकार देण्यात आला होता.गदर 2 आणि ओएमजी 2 या दोन्ही सिनेमांची प्रेक्षकांमध्ये क्रेझ होती. पण पहिल्या दिवसापासून दोन्ही सिनेमांना एकच रिलीज डेट देण्यात आली. दोन्ही सिनेमे क्लॅश झाले असले तरी सिनेमे वेगळ्या धाटणीचे आहेत.

त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन्ही सिनेमे चांगली कमाई करतील अशी अपेक्षा आहे.हेही Pankaj Tripathi : 17 वर्षाच्या लेकीसोबत पंकज त्रिपाठींचं कसं आहे नातं? म्हणाले ‘आम्ही मर्यादा ठेऊनच…’ट्रेंड एनालिस्टच्या माहितीनुसार, दोन्ही सिनेमे पहिल्या दिवशी 40 कोटींची कमाई करतील असा अंदाज लावण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मोठ्या विकेंडमध्ये दोन्ही सिनेमे चांगली कमाई करतील असा अंदाज लावण्यात आला आहे.ट्रेड एनालिस्ट आणि फिल्म क्रिटिक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, गदर 2 रिलीजच्या आधी एकूण 2 लाख 74 हजार अँडवान्स तिकिट्स विकल्या आहेत. याचाच अर्थ गदर 2 हा सिनेमा पहिल्या दिवशी 40 कोटीहून अधिक कमाई करण्याची शक्यता आहे. तर अक्षय कुमारचा ओएमजी पाहण्यासाठी एकूण 72 हजार 500 तिकिटं अँडवान्स विकली गेली आहेत. याचाच अर्थ ओएमजी 2 पहिल्या दिवशी 10 कोटींची कमाई करण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here