शाहिद कपूरचा भाऊ इन्स्टा लाइव्हनंतर कॅमेरा बंद करायला विसरला अन् झाली ‘ही’ मोठी चूक

0
189
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबई : अभिनेता इशान खट्टरचाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्रामवर लाइव्ह आला होता. यावेळी त्याने फॉलोअर्सशी मनसोक्त गप्पा मारल्या. मात्र जेव्हा हा लाइव्ह संपला तेव्हा तो कॅमेरा बंद करण्यास विसरला.

इशानची हीच चूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून त्याला नेटकरी ट्रोल करत आहेत. इन्स्टा लाइव्ह संपल्यानंतर इशान कॅमेरा बंद करायला विसरला आणि त्यादरम्यान त्याचा मित्रासोबतचा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा पब्लिसिटी स्टंट आहे, असंही काहींनी म्हटलंय.

 

लाइव्ह संपल्यानंतर इशान त्याच्या मित्रासोबत सहजपणे गप्पा मारत असतो. दुबईहून टीव्हीएसचं आमंत्रण आल्याचं तो मित्राला सांगतो. यावरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. हा पब्लिसिटी स्टंट असून त्यातही इशानने ‘बनावट अभिनय’ केल्याची टीका काहींनी केली आहे. ‘हे खरंतर प्रमोशनल आहे. इथेसुद्धा त्याने वाईट अभिनय केलं आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘कदाचित प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी त्यांनी हे सर्व केलं असावं. ब्रँडकडून ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी असेल’, असा अंदाज दुसऱ्या युजरने वर्तवला

इशान हा अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ आहे. त्याने मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं असून खासगी आयुष्यामुळे तो अनेकदा चर्चेत आला. अभिनेत्री अनन्या पांडेसोबत त्याचं नाव जोडण्यात आलं होतं. या दोघांना डिनर डेटवर, पार्ट्यांना आणि मालदीव्सच्या व्हेकेशनला एकत्र जाताना पाहिलं गेलं होतं. मात्र रिलेशनशिपविषयी दोघांनी कधीच माध्यमांसमोर कबुली दिली नव्हती. त्यामुळे ब्रेकअपच्या चर्चांवरही दोघांनी मौन बाळगलं होतं.

 

अखेर ‘कॉफी विथ करण 7’ या चॅट शोमध्ये इशानने सिंगल असल्याचं स्पष्ट केलं होतं. कॉफी विथ करणच्या एपिसोडमध्ये इशानने कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत हजेरी लावली होती. ‘मी सिंगल आहे’ असं सिद्धांतने म्हणताच इशानसुद्धा सिंगल असल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं. “मी इतका सिंगल आहे की माझ्यासोबत फिरता फिरता इशानसुद्धा सिंगल झालाय”, असं सिद्धांत म्हणाला. हे ऐकताच करण इशानकडे पाहून म्हणतो, ‘तुझं अनन्यासोबत नुकतंच ब्रेकअप झालं?’ त्यावर ब्रेकअपबद्दल थेट न बोलता इशांत करणला म्हणतो, “खरंच का, कारण तूच आता म्हणालास की तिने माझ्यासोबत ब्रेकअप केलं.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here