फोटोतील ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? मराठी सिनेइंडस्ट्रीतील आहे प्रसिद्ध गायिका अन् अभिनेत्री

0
178
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अनेक कलाकार सध्या सोशल मीडियाचा वापर करत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे ही कलाकार मंडळी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत बिनधास्तपणे शेअर करत असतात.

यात अगदी त्यांच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सपासून ते जुन्या काळातील आठवणींपर्यंत ते बरंच काही सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या नेटकऱ्यांमध्ये अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्री, गायिकेची चर्चा रंगली आहे.

 

सध्या सोशल मीडियावर एका लोकप्रिय अभिनेत्री, गायिकेचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती तिच्या आईच्या कुशीत बसली आहे. हा फोटो पाहिल्यावर अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून लोकप्रिय गायिका केतकी माटेगांवकर आहे

.आपल्या आवाजाच्या जोरावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी केतकी माटेगांवकर एक अभिनेत्रीदेखील आहे. ‘शाळा’, ‘काकस्पर्श’, ‘तानी’ अशा काही गाजलेल्या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. तसंच, अनेक मालिकांसाठी पार्श्वगायनदेखील केलं आहे. काही सिनेमांसाठीही तिने तिचा आवाज दिला आहे. केतकी आज कलाविश्वात प्रसिद्ध असून तिचे आई आणि वडीलदेखील संगीतविश्वाशी जोडलेले आहेत. तिची आई उत्तम गायिका आहे. तर, वडील हर्मोनियम वादक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here