राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांधील तब्बल १७ पदे रिक्त

spot_img

 

मुंबई : मुंबई : आयपीएस अधिकाऱ्यांधील दोन घटकांमध्ये समन्वयकाची भूमिका बजावणाऱ्या विशेष पोलीस महानिरीक्षक/ सहआयुक्त (आयजीपी/जॉईट सीपी) पदाचा गृहविभागाला जणू विसर पडला असल्याची परिस्थिती आहेआस्थापना, प्रशासन यासारख्या महत्त्वाच्या जागेसह राज्यातील या दर्जाची तब्बल १७ पदे रिक्त आहेत.

एक तर त्याचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडून किंवा पद अवनत किंवा पदावनत करून चालविला जात आहे. गेल्या अडीच वर्षांत या पदावर केवळ तीन अधिकाऱ्यांना बढती मिळाली आहे. पोलीस दलात आयजी दर्जाचा अधिकारी हा परिक्षेत्रातील ५, ६ जिल्हा, विभागावर निरीक्षण ठेवून त्याच्यात व पोलीस मुख्यालयाशी समनव्यक म्हणून भूमिका बजावत असतो.

सध्या राज्यात ४४ पदे मंजूर आहेत. काही अपवाद वगळता त्यापैकी केवळ ४,५ जागा या रिक्त राहत असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून १७ पदे रिक्त किंवा अतिरिक्त कार्यभार देऊन चालविली जात आहेत. मे २०१९ नंतर केवळ तिघा डीआयजीचे या पदावर प्रमोशन करण्यात आले आहे. त्यापैकी एस. बी. तांबडे यांना निवृत्तीच्या दोन दिवसांपूर्वी बढती देण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये जय जाधव यांना नवी मुंबईत त्याठिकाणी, तर अंकुश शिंदेना सोलापूरहून बढती देण्यात आली आहे. अनेक अधिकारी बढतीसाठी पात्र आहेत. ही प्रक्रिया अद्याप रखडली आहे.

सध्या रिक्त, डाऊनग्रेड, अपग्रेड करण्यात आलेली पदे
आस्थापना, प्रशासन, एटीएस, पीओडब्लू, एएनओ, संचालक, एमआयए अकादमी, सीआयडी इवोडब्लू आणि इस्टेब्लमेंट, एसारपीएफमधील दोन, व्हीआयपी सुरक्षा यांचा अतिरिक्त कार्यभार दिला गेला आहे. त्याशिवाय एसआयडी, कोकण, एसआयडी, नांदेड, अमरावती,नाशिक याठिकाणी डीआयजीकडे पदभार देण्यात आला आहे, तर पीसीआर व मुंबईत आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेतील पद तात्पुरते अपडेट केले आहे.

प्रलंबित प्रमोशन व रिक्त पदाबाबत विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना केली आहे. या महिनाअखेर हा प्रश्न मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे.
– दिलीप वळसे पाटील (गृहमंत्री)

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले उपचारादरम्यान तीचा मृत्यू , तो गंभीर…

केरळ : स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना केरळमध्ये सोमवारी (19 फेब्रुवारी) घडली आहे. यात पीडित 32 वर्षीय महिलेचा...

VIDEO : भारतात अवघ्या १० रुपयांना मिळणारा कढीपत्ता कॅनडात मिळतोय ‘इतक्या’ रुपयांना

भारतीय मसाल्याच्या पदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ आहे कढीपत्ता . खाद्यपदार्थाला स्वाद येण्यासाठी आपण फोडणीत त्याचा आवर्जून वापर करतो. त्यामुळे भारतातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये तुम्हाला कढीपत्त्याचा...

पोलीस ठाण्यातच निरीक्षकाने डोक्यात झाडून घेतली गोळी

नाशिक : येथील अंबड पोलिस ठाण्यातील गुन्हेशोध शाखेचे पोलीस निरीक्षकांनी मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेनऊ-पावणे दहाच्या सुमारास केबिनमध्ये स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून डोक्यात गोळी झाडून...

मनोज जरांगेंनी उपचार थांबवले, पुन्हा तीव्र उपोषण सुरु; विधेयक मंजूर झाल्यानंतर म्हणाले..

अंतरवाली सराटीः मराठा आरक्षणासाठी मंगळवारी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं होतं. अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत स्वतंत्र आरक्षण...

मेंदीचे खुनी हात,लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरीने घेतला पतीचा जीव..

लखनऊ : हत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मऊ येथे खुनाची ही खळबळजनक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका...