ताज्या बातम्या

सावधान ,प्रथ्वीच्या दिशेने येतोय मोठा लघुग्रह , उरले काही तास.. !

अवघे जग एकीकडे कोरोना सारख्या महामारीला तोंड देत आहे, तर दुसरीकडे अवघ्या काही तासांवर आता पृथ्वीवर नवीन संकट येऊन ठेपले आहे. पृथ्वीच्या दिशेनं आतापर्यंतचा सर्वांत मोठा लघुग्रह येत आहे.हा ग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. या लघुग्रहाचं नामकरण 7482 (1994 PC1) असं करण्यात आलं आहे. ताजमहालाच्या 5 पट इतका मोठा हा गृह आहे. पृथ्वीवर धोका टाळण्यासाठी नासाने मिशन डार्क सुरू केले आहे.

लघुग्रहामुळे(Asteroid) विनाशकारी स्थिती निर्माण होईल, असं गेल्या काही दिवसांपासून बोललं जात आहे. हे लघुग्रह अवकाशात (Space) पृथ्वीभोवती फिरत असतात. आतापर्यंत केवळ एकच लघुग्रह पृथ्वीवर आदळला होता आणि त्यामुळे पृथ्वीवरून डायनॉसॉर (Dinosaur) नष्ट झाले होते. तेव्हापासून अनेक लघुग्रह अनेकदा पृथ्वीच्या (Earth) जवळून गेले, परंतु सुदैवानं अद्याप कोणताही लघुग्रह पृथ्वीवर आदळलेला नाही.

पण आता एक मोठे संकट पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. उद्या पहाटे ३.२१ वाजता पृथ्वीच्या अवकाशात एक अभतपूर्व अशी खगोलीय घटना घडणार आहे. जवळपास एक किलोमीटर लांब एस्टेरोइड हा लघुग्रह पृथ्वीपासून १९ लाख किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. एस्टोरोइड अर्थात लघुग्रहाचा वेग 20 किमी प्रतिसेकंद असणार आहे.

पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये जेवढं अंतर आहे त्याच्या पाच पट दूर अंतरावरून हा लघुग्रह जाणार आहे. हा लघुग्रह कुतुबमिनारच्या ११ पट आणि ताजमहालाच्या ५ पट मोठा आहे. (रिंकू राजगुरूची आई वडिलांसाठी खास पोस्ट ; फोटो शेअर करत म्हणाली…..) पण ७४८२ ( १९९४ पीसी वन ) हा लघुग्रह १८ आणि १९ जानेवारी रोजी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असल्याची बातमी सर्वत्र पसरवली गेली आहे, त्यात काहीही तथ्य नाही. अनेक शास्त्रज्ञांच्या मते या लघुग्रहापासून पृथ्वीला काहीही धोका नसल्याचे जेष्ठ खगोल अभ्यासक दा.

कृ. सोमण यांनी सांगितले आहे. लोकांनी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचे सांगितले. ‘१.१ किमी व्यासाचा हा लघुग्रह पृथ्वीपासून १९ लक्ष ८१ हजार ४६८ किमी.

अंतरावरून जाणार आहे. हे अंतर पृथ्वी-चंद्र अंतराच्या साडेपाचपटीपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नाही नसल्याचे सोमण यांनी म्हटलं आहे. ७४८२( १९९४ पीसीवन ) या लघुग्रहाचा शोध ९ ॲागस्ट १९९४ रोजी रॉबर्ट मॅकनॉट यांनी स्लाइडिंग स्प्रिंग वेधशाळेतून लावला.

हा लघुग्रह ५७२ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. मात्र कधी कधी तो पृथ्वीच्या जवळून जातो. १७ जानेवारी १९३३ रोजी तो पृथ्वीजवळून गेला होता. आता यानंतर १८ जानेवारी २१०५ रोजी तो पृथ्वीजवळून जाणार आहे.

अशाप्रकारे पृथ्वीजवळून भ्रमण करणाऱ्या हजार लघुग्रहांचा तपशील शास्त्रज्ञांना मिळाला आहे. एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार हे अगोदर समजल्यास त्याचा मार्ग बदलणे किंवा तो आदळण्यापूर्वीच त्याचे तुकडे करणे हे लवकरच शक्य होणार आहे. त्यामुळे भीती बाळगण्याचे किंवा चिंता करण्याचे काहीच कारण नाही. १९०८ मध्ये रशियातील तुंगस्का परिसरात ६० मीटर व्यासाची अशनी पृथ्वीवर आदळली होती.

साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मेक्सिको युकातान प्रदेशात १० किमी व्यासाची अशनी आदळल्यामुळे डायनासॉर नष्ट झाले होते. ५२ हजार वर्षांपूर्वी ६० मीटर लांबीचा २० लक्ष टन वजनाचा अशनी पाषाण भारतात लोणार येथे आदळला होता. यावेळी हा लघुग्रह पृथ्वीपासून खूप दुरून जाणार असल्याने तो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नसल्याचे अनेक शास्त्रज्ञांचे मत असल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये. कोणतीही भीती बाळगू नये, असे ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button