साखरपुड्याच्या तीन दिवस आधीच एका रस्ते अपघातात संबंधित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

जानेवारी: औरंगाबादच्या (Aurangabad) धूत रुग्णालयाजवळ सोमवारी रात्री एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. याठिकाणी एका 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे.संबंधित तरुणाचा अवघ्या तीन दिवसांवर साखरपुडा (young man died before 3 days of engagement) होता. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांकडे आनंदाचं वातावरण होतं. असं असताना साखरपुड्याच्या तीन दिवस आधीच एका रस्ते अपघातात संबंधित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू (Death in road accident) झाला आहे. सोमवारी रात्री आपल्या एका मित्रासोबत दुचाकीने कंपनीतून घरी परतत असताना, संबंधित तरुणांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली आहे.

ज्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसरा तरुण जखमी झाला आहे. अतिष संजय देशमुख असं अपघातात मृत पावलेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो औरंगाबाद जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील रहिवासी होता. तर गणेश प्रकाश जाधव असं जखमी झालेल्या 23 वर्षीय युवकाचं नाव आहे.

संबंधित दोघेजण सोमवारी रात्री कंपनीत काम केल्यानंतर घरी परतत होते. तेव्हाच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. मृत अतिषचं अलीकडेच लग्न ठरलं होतं. 9 मार्च रोजी त्याचा विवाह होणार होता.

तर तीन दिवसांनी त्याच्या साखरपुडा पार पडणार होता. माहेरहून परत येताच सासरी केला शेवट, लग्नानंतर 7 महिन्यातच विवाहितेचं टोकाचं पाऊल त्यामुळे अतिष आणि त्याचे कुटुंबीय आनंदात होता. घटनेच्या दिवशी सकाळी अतिषने आपल्या आईला घेऊन गावी गेला होता. त्याठिकाणी त्याने ‘माझं लग्न जमलं आहे, मला आशीर्वाद द्यायला नक्की या’ असं म्हणत नातेवाईकांना आमंत्रण दिलं.

आईला गावी सोडल्यानंतर दोन दिवसांपूर्वी हा तरुण पुन्हा औरंगाबादला परतला. त्यानंतर सोमवारी तो कंपनीत कामासाठी गेला. मृत अतिषच्या वडिलांचं चार वर्षांपूर्वी निधन झालं होतं. तेव्हापासून त्यानं आपल्या कुटुंबाची सर्व जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती.

त्याने अलीकडेच आपल्या मोठ्या भावाचा विवाह मोठ्या दिमाखात लावून दिला होता. नागपूर हादरलं, 2 मुलांची आणि पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या! असं सर्वकाही सुरळीत सुरू असताना, सोमवारी रात्री अतिषला मृत्यूनं गाठलं आहे. अतिषच्या मृत्यूची माहिती कळताच आईनं टाहो फोडला आहे. तर गावातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. मंगळवारी सकाळी घाटी रुग्णालयात अतिषचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. दुपारी चार वाजता पिंपळगाव रेणुकाई याठिकाणी अतिषवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here