तरुणांनाला प्रसिद्ध व्हायची भारी हौस,पडली महागात

आजकाल तरुणांना प्रसिद्ध व्हायची भारी हौस असते. विविध प्रकारचे व्हिडीओ (Video) करायचे आणि सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करायचे हा उद्योग अनेकजण करत असताबरेच जण चांगला कंटेटही देतात, मात्र तरीही काहीतरी विचित्रपणा करून लोकांचं लक्ष वेधून घेणाऱ्यांची संख्याही कमी नाही. काहीजण विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र सोशल मीडियावर अशी हवा करणं दोन तरूणांच्या अंगलच आलंय. पोलीसांनी त्यांच्यावर कारवाई (Police Action) केली आहे. या युवकांचा (youth) हात जोडतानाचा फोटो शेअर होत आहे.

व्हायरल झालेल्या या तरूणांच्या व्हिडीओमध्ये दोन तरूण एका रस्त्यावरून बुलेटवरून जात आहेत. तसं जाण्यात काहीच गैर नाही, परंतु यापैकी एक तरूण बुलेट चालवणाऱ्या त्याच्या मित्राच्या खांद्यावर बसून मस्तपैकी सिगारेट (Cigarettes) ओढत आहे. विशेष म्हणजे त्याच्या दुसऱ्या हातात पिस्तुल (Pistol) दिसत आहे. दहशत पसरवणाऱ्या या व्हिडीओला ‘खलनायक’ हे कॅप्शन दिलं आहे.गाडीच्या नंबरवरून ही गाडी गुजरातमधील असल्याचे दिसतंय.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here