नैराश्यातून २३ वर्षीय युवकाची तलावात उडी मारून आत्महत्या

spot_img

धनकवडी/पुणे : आई, बाबा, आजी,आजोबा आणि भक्ती मला माफ कर मी जगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय करू प्राँब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला, असा मेसेज करुन एका तरुणाने कात्रज येथील भिलारेवाडी तलावात उडी मारुन आत्महत्या केली अग्निशामन दलाच्या जवानाने आज सकाळी ९ वाजल्या सुमारास तलावातून या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.

जीवनात आलेल्या नैराश्यातून २३ वर्षीय युवकाने कात्रज भिलारेवाडी येथील तलावात उडी मारून आत्महत्या केली असून आत्महत्या करण्यापुर्वी त्याने घरच्यांना मेसेज केला होता. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. शंकर बसवराज कलशेट्टी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कात्रज अग्निशामक केंद्रातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला असून शिवविच्छेदन रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शंकर ने रविवारी रात्री उशिरा घरच्याना मी आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला होता. मेसेज पाहताच घरातील सदस्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेतली, भारती विद्यापीठ पोलिसांनी रात्री दीड दोन वाजेपर्यंत तपास केला. दरम्यान रविवारी सकाळी पुन्हा तपास केला असता भिलारेवाडी तलावाजवळ चप्पल दिसल्याने पोलिसांनी कात्रज अग्निशामन केंद्राला कळविले. कात्रज अग्निशामक केंद्रातील जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि काही वेळातच तरुणाचा मृत्यूदेह बाहेर काढला. शंकर ने आत्महत्या करण्यापूर्वी ब्लेडने हाताची नस कापली होती.

म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला

माझ्या जीवनात काही समस्या आहेत, आणि त्या मी सोडवू शकत नाही आणि त्या समस्या संपतही नाहीत त्या फक्त वाढतच आहेत. या सर्व समस्या कोणासोबत शेअर करणे सुद्धा अपमानास्पद वाटते. या सर्व समस्या घेउन मी जगूही शकत नाही. काही दिवसांनी या समस्या अजूनही वाढत जाणार, मी सहन करू शकत नाही. अगोदरच खुप त्रास सहन केला आहे. आता आजिबात सहन होत नाही. म्हणून मी माझ्या स्वत: च्या इच्छेने माझे जीवन संपवत आहे. माझ्या आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरू नये. पोलिसांनी कोणाचीही विचारपूस करण्याची गरज नाही. आई, बाबा, आजी,आजोबा आणि भक्ती मला माफ कर मी जगण्याचा खूप प्रयत्न केला़ पण काय करू प्राँब्लेम घेऊन मी नाही जगू शकत म्हणून मी शेवटचा निर्णय घेतला असा मेसेज करून शंकर ने आत्महत्या केली.

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले उपचारादरम्यान तीचा मृत्यू , तो गंभीर…

केरळ : स्कूटीवरून ऑफिसला जाणाऱ्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची घटना केरळमध्ये सोमवारी (19 फेब्रुवारी) घडली आहे. यात पीडित 32 वर्षीय महिलेचा...

VIDEO : भारतात अवघ्या १० रुपयांना मिळणारा कढीपत्ता कॅनडात मिळतोय ‘इतक्या’ रुपयांना

भारतीय मसाल्याच्या पदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ आहे कढीपत्ता . खाद्यपदार्थाला स्वाद येण्यासाठी आपण फोडणीत त्याचा आवर्जून वापर करतो. त्यामुळे भारतातील अनेक खाद्यपदार्थांमध्ये तुम्हाला कढीपत्त्याचा...

पोलीस ठाण्यातच निरीक्षकाने डोक्यात झाडून घेतली गोळी

नाशिक : येथील अंबड पोलिस ठाण्यातील गुन्हेशोध शाखेचे पोलीस निरीक्षकांनी मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेनऊ-पावणे दहाच्या सुमारास केबिनमध्ये स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून डोक्यात गोळी झाडून...

मनोज जरांगेंनी उपचार थांबवले, पुन्हा तीव्र उपोषण सुरु; विधेयक मंजूर झाल्यानंतर म्हणाले..

अंतरवाली सराटीः मराठा आरक्षणासाठी मंगळवारी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं होतं. अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत स्वतंत्र आरक्षण...

मेंदीचे खुनी हात,लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरीने घेतला पतीचा जीव..

लखनऊ : हत्येची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मऊ येथे खुनाची ही खळबळजनक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी एका...