कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्याकडे आरटीपीसीआर (RTPCR) रिपोर्टची मागणी

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर कोगनोळी जवळ (Kognoli Check Post)असणाऱ्या दूधगंगा नदीवर कर्नाटक (Karnatka) सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त पुन्हा कडक करण्यात आला आहे महाराष्ट्र व इतर राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांच्याकडे आरटीपीसीआर (RTPCR) रिपोर्टची मागणी करण्यात येत आहे. ज्या प्रवाशांच्याकडे आरटीपीसीआर रिपोर्ट नाही अशा प्रवाशांना परत महाराष्ट्रात (Maharashtra) पाठवून देण्यात येत आहे.

गेल्या आठ दिवसांमध्ये महाराष्ट्रात वाढत असलेले रुग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर येथील कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. रविवार (ता.२) रोजी सकाळपासूनच या ठिकाणी बंदोबस्त कडक करून हा रिपोर्ट नसणाऱ्या प्रवाशांना परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात येत आहे. महाराष्ट्र व इतर राज्यातून येणाऱ्या बस व अन्य वाहनातून येणाऱ्या प्रवाशांचे कोगनोळी फाट्यावर तपासणी करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येमुळे कर्नाटक शासनाने कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त वाढवला असून महाराष्ट्र लगत असणाऱ्या गडहिंग्लज, आजरा, चंदगड, उत्तूर या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना कागदपत्रांची तपासणी होत आहे.

मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक एस ए टोलगी, राजू गोरखनावर यांच्यासह अन्य पोलीस, आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here