पिंपरी : रामदास आठवले ‘या’ मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक

0
91
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डी; तसेच मुंबई किंवा विदर्भातील एक अशा दोन जागांची मागणी महायुतीकडे केली आहे. शिर्डीतून मी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.आकुर्डीत पक्षाच्या मेळाव्यापूर्वी आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या वेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, परशुराम वाडेकर, अजीज शेख उपस्थित होते.

हेही वाचा >>> पुणे : शिकवणी चालक महिलेची पाच लाखांची फसवणूक

आठवले म्हणाले, की राज्यसभा सदस्यत्वाचा माझा २०२६ पर्यंत कार्यकाळ आहे. शिर्डीतून २००९ मध्ये पराभव झाला होता. आता शिर्डीतून निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. तेथे शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत. महायुतीने तोडगा काढून शिर्डीतून लढण्याची संधी द्यावी. मुंबई, विदर्भात पक्षाची मोठी ताकद आहे. त्यामुळे तेथील एक जागा मिळावी. याबाबत भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करणार आहे. ‘सब का साथ, सब का विश्वास’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेमुळे आम्ही भाजपसोबत आहोत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> सातारा रस्त्यावर धावत्या मोटारीला आग; मोटारचालकासह महिला त्वरीत बाहेर पडल्याने अनर्थ टळला

लोकसभेच्या ४८ पैकी ४० जागा महायुतीच्या येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संविधान बदलाबाबत विरोधकांचे आरोप राजकीय आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नये. पंतप्रधान मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार नाहीत. त्यांच्या काळात बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला गती मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका डिसेंबरअखेर किंवा जानेवारीत होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या निवडणुका होतील. पिंपरी-चिंचवडमध्ये आरपीआयची चांगली ताकद आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत १५ जागा मिळाव्यात, अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here