अजित पवार गटाचे आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल; आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर अजित पवार गटाचे आरोप

0
80
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

 

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल विरोधात धमकीप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकारानंतर अजित पवार गट आक्रमक झाला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड हे खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याचा आरोप अजित पवार गटाचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केला आहे.

आनंद परांजपे यांच्यासोबत सोनल या विवाह करून आल्या. त्यावेळी दिवंगत प्रकाश परांजपे हे खासदार होते, असे असताना त्या कधीही राजकारणात डोकावले नाही. कुटुंबियांचा राजकारणाशी संबंध नसताना त्यांची नावे ओढायचे काम सुरू आहे. पोलिसांवर दबाव आणून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा पातळीचे राजकारण करू नये, अशी टिका नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांच्यावर केली.

हेही वाचा… ठाणे: शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

बातमीमध्ये राहण्यासाठी काहीजणांमध्ये अतिहौस आहे. ठाण्याच्या राजकारणाची पातळी केवळ आव्हाड यांच्यामुळे सुटल्याचे मुल्ला म्हणाले. आम्ही त्यांच्या स्वभावामुळे साथ सोडली. याचा आनंद आहे असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here