अ जीवनसत्त्वाचे महत्त्व

0
64
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

जीवनसत्त्व अ हे शरीराला लागणारे एक महत्त्वाचे पोषणद्रव्य असून ते मेदात विरघळते. म्हणजे शरीरात अ जीवनसत्त्वाचे पचन आणि शोषण होण्या करिता मेद अथवा स्निग्ध पदार्थांचे माध्यम लागते. सर्वसाधारणपणे फक्त दृष्टीसाठी किंवा डोळ्यांच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्व अ लागते हे सर्वज्ञात आहे, परंतु दृष्टी शिवायही इतर बऱ्याच कार्यात जीवनसत्त्व अ महत्त्वाचे कार्य करते.•आपल्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यात जीवनसत्त्व अ चा महत्त्वाचा वाटा असतो. आपल्या दृष्टीपटलातील पेशींचे कार्य सुरळीत चालण्यासाठी, आपली दृष्टी निर्दोष असण्यासाठी जीवनसत्त्व अ मधील घटक गरजेचे असतात. अंधारातून एकदम प्रकाशात अथवा प्रकाशातून एकदम अंधारात गेल्यावरही आपले नेत्र आजूबाजूच्या घटना पाहू शकतात, हे कार्य जीवनसत्व अ शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. शरीराच्या योग्य वाढ आणि विकासाकरीता अ जीवनसत्त्व लागते.•आपल्या त्वचेतील एपिथेलिअल पेशींची सबंधता जीवनसत्त्व अ वर अवलंबून असते.•जीवनसत्त्व अ हे आपली रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्याचेही कार्य करत असते.•मातेच्या दुधातून बाळाला जे अ जीवनसत्त्व मिळते ते त्याच्या उत्तम आरोग्याचा पायाच बनते.•जीवनसत्त्व अ चा घटक ‘कॅरोटीन’ हे एक महत्त्वाचे एन्टिऑक्सिडंट आहे.

तर अशा आपल्या शरीरातील विविध अवयवांचे कार्य सुरळीत होण्यासाठी जीवनसत्त्व अ लागत असते. याच्या आहारातील कमतरतेमुळे शरीरावर खालील परिणाम होतात.•जीवनसत्त्व अ ची कमतरता झाल्यास सर्वप्रथम आपल्या दृष्टीवरच त्याचा परिणाम दिसून येतो. दृष्टी अधू होणे, नेत्रपटलावर डाग तयार होणे (bitot’s spot), रातांधळेपणा, डोळ्यांना प्रकाशाची संवेदनशीलता हे परिणाम दिसून येतात. हे कमतरता जर खूप टोकाच्या परिस्थितीमध्ये अंधत्वसुद्धा देऊ शकते.•आपली त्वचा रुक्ष अथवा कोरडी होऊ शकते, त्वचेवरील तजेला नाहीसा होऊन त्वचा निस्तेज दिसायला लागते.•लहान मुलांमध्ये कमतरता झाल्यास त्यांची वाढ खुंटू शकते, रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने मुले सतत आजारी पडायला लागतात. नवजात शिशूंना आईचे दूध मिळाले नाही तर आईच्या दुधातून मिळणाऱ्या जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे बाळाचे आरोग्य खराब होऊ शकते.•जीवनसत्त्व अ च्या कमतरतेचे परिणाम हाडे आणि दातांच्या आरोग्यावरही दिसून येतात.

जीवनसत्त्व अ चे आहारातील स्रोत

साधारणपणे पिवळ्या, नारिंगी रंगाच्या सर्व पदार्थातून अ जीवनसत्त्व मिळते. कॉड माशाचे तेल, लिवर, अंडी या प्राणिज स्रोतांमध्ये जीवनसत्त्व अ चे प्रमाण सर्वात जास्त असते. शिवाय दूध, दुधाचे पदार्थ, सर्व नारिंगी-पिवळ्या भाज्या जसे आंबा, गाजर, टोमॅटो, लाल भोपळा, आंबा, पपई, सर्व हिरव्या पालेभाज्या यातूनही अ जीवनसत्त्व मिळते.

तर आपल्या आहारात अ जीवनसत्त्व असणारे सर्व पदार्थ कायम आहेत की नाही, याकडे लक्ष द्या जेणेकरून त्याच्या कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम तुम्हाला होणार नाहीत.एका जागी बसून तासन् तास काम करणाऱ्या आणि व्यायामासाठी वेळ न मिळणाऱ्या अनेकांसाठी आपल्या कामाच्या ठिकाणहून उठून ऑफिसमध्ये फेरी मारून येणं, हा सुद्धा एक व्यायाम ठरू शकतो. अशा व्यक्तींनी काही लहान ध्येये डोळ्यांसमोर ठेवत काही नवीन गोष्टी आपल्या जीवनात केल्या तर फिट राहण्यास सहज मदत होईल. तुमच्या शरीराला हालचाल देत थोडा व्यायामही हवा असेल तर या गोष्टी करायलाच हव्यात.

ऑफिस जिमचा वापर करा ■ ऑफिसमधलं काम, सततच्या मिटिंग, कामाचं टार्गेट यातून थोडा वेळ काढत ऑफिसमधल्या जिममध्ये तुम्ही नक्कीच जाऊ शकता. त्यामुळे व्यायामासाठी वेगळा वेळ द्यावा लागणार नाही आणि व्यायामासह ऑफिसमधल्या इतर सहकाऱ्यांशी संवादही साधता येईल. उभे राहून काम करा ■ दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्यांच्या शरीराला पुरेशी हालचाल नसते. अशा वेळी थोड्या थोड्या अंतराने बसून काम करण्याऐवजी उभे राहून काम केल्यास शरीरातील स्नायूंना थोडी चालना मिळू शकते. गाडी ऑफिसपासून दूर पार्क करा ■ गाडी ऑफिसपासून दूर लावल्याने पार्किंगची जागा ते तुमची केबिन असा एक उत्तम वॉक तुम्ही घेता आणि पुढील कामासाठी लागणारी गती तुम्हाला मिळते. लिफ्टचा वापर टाळा ■ घरातून निघताना किंवा ऑफिसमध्ये पोचल्यावर लिफ्टऐवजी जिन्याने वर चालत गेल्यास तुमच्या थोड्या कलरी सहज खर्ची पडतील. चॅटिंगला नाही म्हणा ■ कामाच्या वेळी फोनवर मित्रांशी चॅट करण्यापेक्षा आपल्या बाजूच्या केबिनमधल्या सहकाऱ्याशी जाऊन बोला. शरीराला हालचालही मिळेल आणि कदाचित तुमच्या कामात त्याची मदतही. स्नायू सैल सोडा ■ एकाच जागी बसून स्नायूंना चालना देण्यासाठी ठराविक वेळेनंतर थोडा ब्रेक घ्या. बसल्या जागी हात स्ट्रेच करून करता येतील असे काही स्ट्रेचिंगचे प्रकार केल्याने स्नायू सैल पडतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here