ब जीवनसत्त्वाचे महत्त्व

0
84
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी त्याला अनेक गोष्टींची आवश्यकता असते. जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, फायबर, स्निग्ध पदार्थ यांसारखे घटक शरीराला आवश्यक असतात. यातील एका घटकाची जरी कमतरता झाली तरी आरोग्याचे गणित बिघडते. जीवनसत्त्वे आपल्या आरोग्याच्या अनेक गोष्टी सुकर कऱण्यास मदत करतात. यातही काही जीवनसत्त्वे आरोग्यासाठी जास्त उपयुक्त असतात. ब जीवनसत्त्व (Vitamin B) हे यातीलच एक महत्त्वाचे जीवनसत्त्व असून काही प्रमाणात ती शरीरात तयार होतात. मात्र ते पुरेसे नसल्याने आपल्याला बाहेरुनही जीवनसत्त्वे घ्यावी लागतात. ब जीवनसत्त्व हे शारीरिक गोष्टींबरोबरच त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त असते. ब जीवनसत्त्वाचे अनेक प्रकार असून B1, B2, B3, B5, B6, B7, B9 आणि B12 हे शरीरासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत. या घटकांमुळे खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत रुपांतर होण्यास मदत होते. ही ऊर्जा आपली चयापचय क्रिया, मज्जासंस्था, डोळे, त्वचा आणि केसांना पुरविण्यात येते. काही पदार्थांमधून हे ब जीवनसत्त्व शरीराला मिळते आणि त्यामुळे वजन वाढण्यास तसेच स्नायू बळकट होण्यास मदत होते. पाहूयात ब जीवनसत्त्व देणारे काही पदार्थ…

प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत – उत्तम आरोग्यासाठी दररोज किमान १.३ मिलीग्रॅम  ब २ जीवनसत्त्व आवश्यक असते. दाणे, सुकामेवा, दूध, मटण, पालेभाज्या यामध्ये ब २ जीवनसत्त्व असते. त्वचा आणि रक्तपेशी चांगल्या ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

हार्मोन्सच्या कार्यासाठी जीवनसत्त्व ब ५ उपयुक्त – हे जीवनसत्त्व कोबी, ब्रोकोली यांसारख्या भाज्यांमध्ये असते. हे जीवनसत्त्व बटाटा आणि डेअरी उत्पादनांमध्येही असते. हार्मोन्सची निर्मिती आणि वाढ होण्यासाठीही हे जीवनसत्त्व उपयुक्त ठरते.

अॅनिमिया रोखण्यास उपयुक्त – जीवनसत्त्वांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. रक्तपेशींची निर्मिती होण्यासाठी तसेच मज्जासंस्थेचे काम सुरळीत चालण्यासाठी जीवनसत्त्वांचा उपयोग होतो. ब १२ जीवनसत्त्व यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. मासे आणि मटण यामध्ये ते जास्त प्रमाणात असते.

ब जीवनसत्त्वामुळे स्ट्रोकचा धोका कमी – शरीरात पुरेशा प्रमाणात ब जीवनसत्त्व असेल तर स्ट्रोक येण्याची शक्यता कमी असते. रक्ताच्या गाठींमुळे रक्तप्रवाह होण्यास अडथळा होतो. पण शरीरात पुरेशी जीवनसत्त्वे असल्यास स्ट्रोक येण्याची शक्यता कमी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here