पत्नी सोडून जाताच पती २ कॉलगर्लला घरी बोलवायचा; ‘त्या’ रात्री भयंकर घडलं अन् गमवावे लागले प्राण

0
255
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

शि   वीगाळ केल्याच्या रागातून कॉल गर्लने 42 वर्षीय व्यक्तीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची घटना बापगाव येथे घडली आहे. दीपक कुऱ्हाडे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी शिवानी, भारती या दोन कॉल गर्ल्ससह संदीप पाटील यालाही अटक केली आहे. फरार देवा रॉय याचा पोलीस शोध घेत आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक कुऱ्हाडे हा बापगाव येथील मल्हार चाळीत गेल्या चार वर्षांपासून राहत होता. तो मूळचा बीड जिल्ह्यातील असून इंटेरिअर डिझायनर म्हणून काम करत होता. पत्नीपासून विभक्त झालेल्या दीपकची तीन वर्षांपूर्वी महाविद्यालयीन तरुणी शिवानीशी भेट झाली.

 

दरम्यान, काही दिवसांपासून शिवानीने दीपकच्या घरी येणे बंद केले. 29 जून रोजी दीपकने शिवानीला फोन करून घरी बोलावले. मात्र तिने नकार दिल्याने त्याने तिला शिवीगाळ केली.

 

याचा राग येऊन तिने तिचा साथीदार संदीप, फ्रेंड कॉल गर्ल भारती, तिचा प्रियकर देवा याच्यासोबत दिपकच्या घरातील दागिने पैशांची लूट करण्याचा कट रचला. त्यानुसार 30 जून रोजी नशेत असलेल्या दीपकचा या चौघांनी मिळून चाकूने गळा चिरून खून केला.

 

दरम्यान, 2 जुलै रोजी दीपकच्या आईने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला. यावेळी दीपक फोन उचलत नसल्याने कल्याण येथे राहणाऱ्या दीपकच्या पत्नीने सासूच्या सांगण्यावरून बापगाव गाठले. यावेळी घराला बाहेरून कुलूप असल्याने दीपक यांच्या मुलीने दरवाजा उघडला असता वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

 

दरम्यान, पोलिसांनी शिवानीला उल्हासनगरमधील मानेरे गावातून ताब्यात घेतले असून चौकशीत तिने संदीप, देवा आणि भारती यांच्या मदतीने दीपकची हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी संदीप आणि भारती यांनाही अटक केली असून त्यांच्याकडून 30 हजार रुपये रोख, एक चाकू आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली असून, पोलीस देवाचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here