क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेसोलापूर

पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? दोन्ही मुलीच झाल्या; कुटुंबाला वारस दिला नाही म्हणून पती, सासूकडून पत्नीचा छळ


तु  आम्हाला वारस दिला नाही, दोन्ही मुलींनाच जन्म दिला म्हणून पती व सासूने सोलापूर : ‘कंपनी बंद पडलीय, कामधंदा नाही, माहेरून आठ लाख रुपये आण, घराचे बांधकाम करायचे आहे, नाहीतर तुला नांदवणार नाही’ म्हणून सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केला.वारंवार छळ केलाआई-वडिलांनी कर्ज काढून पाच लाख रुपये दिले

 

तरीसुद्धा संशय घेऊन सासरच्यांनी त्रास दिला. दोन्ही मुलीच झाल्या, आम्हाला वारस दिला नाही म्हणूनही छळ केला, अशी फिर्याद प्रियंका महेश मोरे (रा. बुधवार पेठ) यांनी फौजदार चावडी पोलिसांत

दिली.दरम्यान, २९ एप्रिल २०१२ ते १२ एप्रिल २०२३ या काळात सासरच्यांनी विविध कारणांवरून छळ केला. पती व सासूने घरातील किरकोळ कामावरून शिवीगाळ करीत मारहाण देखील केली. काम करीत असलेली कंपनी बंद पडल्याने आता कामधंदा नाही. त्यामुळे माहेरून आठ लाख रुपये आण, नाहीतर नांदवणार नाही अशी दमदाटी केली.

माहेरच्यांना विनंती केल्यावर त्यांनी पाच लाख रुपये कर्ज काढून सासरच्यांना दिले. तरीपण, त्यांनी संशय घेऊन दोन मुलींसह घरातून हाकलून दिले. आईने वेळोवेळी विनंती केली, पण नांदवणार नाही असे त्यांनी सांगितले.

 

सातारा येथे नणंदेच्या खोलीत ठेवले. सोने घेऊन तेथून माहेरी हाकलून दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. त्यावरून पती महेश शाहू मोरे व सासू राधा शाहू मोरे (दोघेही रा. थेरगाव फाटा, पुणे) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार श्री. मुजावर तपास करीत आहे

त.आम्हाला वारस दिला नाही, दोन्ही मुलींनाच जन्म दिला म्हणून पती व सासूने वारंवार छळ केला. तू आमच्याकडे आता नांदायला येवू नको, तू आणि तुझ्या दोन्ही मुली भीक मागून खावा म्हणून त्यांनी माहेरी हाकलून दिले.

 

तसेच तुम्हाला खुल्लास करतो आणि मी दुसरे लग्न करतो, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. पुरोगामी महाराष्ट्रात मुलाऐवजी मुलींनाच जन्म दिला म्हणून विवाहितांचा कौटुंबिक छळ होतोय, हे शासनाच्या ‘बेटी बचावो, बेटी पढाओ’चा लोकांना विसर पडल्याची सद्य:स्थिती आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *