महाराष्ट्रातील राजकारणातला पहिला सामाजिक प्रयोग..

0
134

महाराष्ट्रातील राजकारणातला पहिला सामाजिक प्रयोग…

आ.सुहास अण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे यांच्या स्वःखर्चातून मतदार संघातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा व सेतू सुविधा घरपोच पुरविण्यात येत आहेत…


नांदगाव : (स्वप्निल धनवटे ) तालुक्यातील नागरिकांना जेसीबी सुविधा या आधीच उपलब्ध झालेल्या असून मोफत कार्यालयीन सुविधांचा शुभारंभ दिनांक 11 मार्च 2023 रोजी आमोदे व बोराळे या गावातून करण्यात आला. सुसज्ज अद्ययावत उपकरणांसह दोन गाड्यांचे युनिट,डॉक्टर,सिस्टर, मदतीस,डोळ्यांचे डॉक्टर,सेतू कार्यालय प्रतिनिधी व स्टाफ सोबत सकाळी ९.०० वाजता दोन्ही गावात कार्यालयीन गाड्यांसमोर नारळ फोडून या सेवा देण्यात सुरुवात करण्यात आली.
बोराळे गावातून 264 नागरिकांची नेत्र तपासणी झाली असून 30 नागरिकांना ऑपरेशनचा सल्ला देण्यात आला. त्याच बरोबर 250 नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. तसेच 55 नागरिकांना शासकीय दाखले ही देण्यात आले.
तसेच आमोदे गावातून 305 नागरिकांची नेत्र तपासणी केली असून 36 नागरिकांना ऑपरेशनचा सल्ला देण्यात आला. त्याचबरोबर 235 डोळ्यांचे चष्मे वाटप करण्यात आले तसेच 45 लोकांना शासकीय दाखले देण्यात आले. यामध्ये बोराळे गावातून ओपीडी 72 तर आमोदे गावातून 100 नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली या सेवा नागरिकांना दिवसभर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत या सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.याप्रसंगी तात्काळ चष्मे वाटप करण्यात येत होते.तसेच तात्काळ औषधेही देण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता आमोदे येथील ग्रामपंचायत सरपंच वैशालीताई पगार,विठ्ठल पगार,बोराळे ग्रामपंचायत सरपंच अश्विनीताई पवार,राजेंद्र अण्णा पवार,सर्व ग्रामपंचायत सदस्य,शिवसेना जिल्हाप्रमुख किरण भाऊ देवरे,मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद भाबड आदींसह ज्येष्ठ ग्रामस्थ, महिलावर्ग व नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत असून या सुविधांबद्दल आमदार सुहास अण्णा कांदे यांचे नागरिकांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here