आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्या मुळे अर्थसंकल्प 2023 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघासाठी 212 कोटींची कामे मंजूर

0
70

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्या मुळे अर्थसंकल्प 2023 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघासाठी 212 कोटींची कामे मंजूर

नांदगाव : अर्थसंकल्प 2023 मध्ये नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते पूल यावर लक्ष केंद्रित करत पाठपुरावा केला असता 212 कोटींची कामे मंजूर करून घेण्यात यश मिळवले.
नांदगाव मतदार संघातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले होते तसेच अनेक रस्त्यांवर पुल नसल्यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते पावसाळ्याच्या कालावधीत नदी नाल्यांना पूर आल्यामुळे वाहतूक बंद होऊन अनेक गावे व वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटत होता. त्यामुळे रस्त्यावर पूल बांधणे रस्त्यांची सुधारणा होणे आवश्यक होते यासाठी आमदारांनी अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांचे व पुलांचे कामासाठी निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला त्या अनुषंगाने नांदगाव मतदार संघातील राज्य मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांची सुधारणा व पुलांच्या कामासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला त्यापैकी नांदगाव तालुक्यात 79 कोटी दहा लक्ष निधी मंजूर करण्यात आला असून राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी 32 कोटी 65 लक्ष तर इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांसाठी 45 कोटी 45 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे नांदगाव विधानसभा मतदार संघातील व मालेगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी 124 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.
रस्त्यांच्या व पुलांच्या कामांमुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतीमाल ने आण करण्यासाठी तसेच नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर होणार असल्याने जनतेमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here