प्रेमाचा चौकार! दोन महिलांचे जडले एकमेकींच्या नवऱ्यावर प्रेम..

0
124

प्रेमात काहीही होऊ शकतं. काहीवेळा प्रेमात अनेक आश्वासनं दिले जातात पण ते पूर्ण होतातंच असं नाही. प्रेमाच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. किंवा आपलीही वैयक्तिक एखादी प्रेमाची कहाणी असेल.

सध्या एक घटना समोर आली असून दोन शेजारी असलेल्या महिलांचे एकमेकींच्या नवऱ्यावर प्रेम जडले असल्याची माहिती आहे.

अधिक माहितीनुसार, हा प्रकार बिहारमधील खागारिया येथे घडला आहे. शेजारी राहणाऱ्या दोन महिलांना एकमेकांचा नवरा आवडू लागला आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. पण या दोन्हीही महिलांना मुले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर दोन्ही महिलांनी एकमेकींच्या नवऱ्यासोबत लग्न केलं असून सदर पुरूषांनीसुद्धा एकमेकांच्या मुलांना स्विकारलं आहे. दोन महिलांनी आपला नवरा आदलाबदली केला हे वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल. पण हा प्रकार बिहारमध्ये घडला आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या अनोख्या प्रेमाची आणि लग्नाची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here