9.2 C
New York
Saturday, April 20, 2024

Buy now

वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा संपन्न

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीचा सत्ता संपादन मेळावा संपन्न
एकतानगर जटवाडा रोड संघरत्न बुद्धविहाराजवळ छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे दिनांक 1मार्च 2023रोजी पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अमित भाऊ भुईंगळं राज्ययुवानेते होते. उद्घाटक राज्य प्रवक्ते अहमद साहेब तर मार्गदर्शक मा.सर्वजीत बनसोडे राज्य उपाध्यक्ष होते.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवानी यांनी सांगितले की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचा महापौर झाल्याशिवाय राहणार नाही.
श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा चाहता वर्ग महाराष्ट्र आणि सबंध देशांमध्ये आहे मोदींना जेलमध्ये टाकण्याची भाषा करण्याची हिम्मत फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्यातच आहे, भाजपा सरकारची बेधुंदशाही चालू आहे,चिंचवड कसबा येथील आमदारांचे निधन झाल्याने सहा महिन्याचे आत पोटनिवडणुका घेतल्या,मात्र औरंगाबाद महानगरपालिका 2020 पासून प्रशासक बसविला आहे भाजप सरकार येथे निवडणुका घेत नाही असा टोला सर्वजीत बनसोडे सर यांनी मारला. आम्ही आमच्या तक्रारी अडचणी नगरसेवाकडे मांडतो, तहसीलदारकडे मांडतो जिल्हाधिकाऱ्याकडे मांडतो, निदर्शने, भाषणे, करतो आणि तशी आपली तक्रार हे मुख्यमंत्र्याकडे पाठवल्या जाते मात्र बाळासाहेब आंबेडकर राज्य शासन आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा तुम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्यावी अशी त्यांनी उपस्थिताना विनंती केली.
या मेळाव्याला
पूर्व जिल्ह्याचे अध्यक्ष मा.प्रभाकर बकले, पश्चिम चे मा.योगेश बन,युवा आघाडी अध्यक्ष मा.सतीश गायकवाड, राजेश जाधव,महिला आघाडी अध्यक्ष लताताई बामणे , किशनचंद तनवाणी शहर जिल्हा अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, एडवोकेट पंकज बनसोडे जिल्हा महासचिव, संघराज्य धमकीर्ती,मिलिंद बोर्डे,हरणे उपशहर प्रमुख शिवसेना फसाटे विभाग प्रमुख शिवसेना, संदीप सूर्यवंशी उपविभाग प्रमुख, बाळासाहेब थोरात मध्ये शहर शिवसेना अध्यक्ष, सुलोचनाताई साबळे,उपाध्यक्ष रूपचंद गाडेकर, रामेश्वर तायडे,एसपी मगरे,बाबासाहेब दुशिंग, नागेश जाधव,बाबासाहेब खंडागळे, प्रदीप इंगळे मधूर चव्हाण,नंदन जाधव एडवोकेट आशा जाधव, उषा बोर्डे,सविताताई जाधव, विजय वाघुले,निलेश बोर्डे,महेश शेजवळ राजू पवार, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आयोजन मिलिंद बोर्डे, राजेश जाधव, यांनी तर सूत्रसंचालन रामेश्वर तायडे यांनी केले.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles