बापरे! इंजेक्शन देताच दोन महिन्याच्या बाळाचा मृत्यू..

0
85

बापरे! इंजेक्शन देताच दोन महिन्याच्या बाळाचा मृत्यू..

धाराशिव येथे जुणोनी गावामध्ये असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात इंजेक्शन दिल्यानंतर २ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बाळाचा मृत्यू इंजेक्शन देताच झाल्याचा आरोप बाळाच्या आईने केला आहे.

इंजेक्शन दिल्यानतंर बाळ काहीच हालचाल करत नसल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तिथे डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले आहे.

जुणोनी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात २ महिन्यांच्या बाळाला त्याच्या कुटुंबियांनी आणले होते. तिथे पेटांचे तीन इंजेक्शन बाळाला देण्यात आले होते. त्यानंतर बाळ हालचाल करत नसल्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तपासणीनंतर बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान, बाळाच्या मृत्यूने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आक्रमक भूमिका घेत संताप व्यक्त केला असून, शवविच्छेदन अहवाल आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे नातेवाईकांनी म्हटले आहे.

‘देव माणूस’ स्टाईलने पतीला दिले इंजेक्शन अन् काही क्षणातच…

पत्रकाराने पत्नीला अंमली पदार्थाचे इंजेक्शन देऊन मारले ठार अन्…

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here