ट्रेन आणि ट्रकच्या भीषण अपघाताचा पहा एक थरारक व्हिडिओ..

ट्रेन आणि ट्रकच्या भीषण अपघाताचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहे. या अपघातात ट्रेन रेल्वे रुळावरुन खाली घसरलीच पण ट्रकचा चक्काचूर झाला आहे. ही घटना अमेरिकेच्या Tennessee येथील असल्याचं बोललं जात आहे.
रिपोर्टनुसार, गेल्या मंगळवारी एक ट्रक १३५ फूट लांबीचा क्रॉंक्रीटचं रेलिंगची वाहतूक करत होता. रेल्वे फाटक क्रॉस करत असतानाच प्रचंड वेगानं येणाऱ्या ट्रेननं धडक दिली आणि भीषण अपघात घटला.

व्हिडिओ पहा

ट्रकचा काही भाग रेल्वे फाटक ओलांडलं होतं. पण काँक्रीट रेलिंगचा भाग रेल्वे रुळावरच असताना मालगाडी ट्रेननं जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की भल्यामोठा ट्रक काहीशे फूट दूरपर्यंत फेकला गेला. ट्रकचा पुरता चक्काचूर झाला. तर ट्रेनही रेल्वे रुळावरुन घसरली. रेल्वेचे अनेक डबे घसरले आणि इंजिनलाही फटका फसला आहे. सुदैवानं या अपघातात अद्याप कुणाच्याही जीवीतहानीची माहिती समोर आलेली नाही. पण काही जण गंभीर जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू आहेत.
ट्रेन आणि ट्रकच्या भीषण अपघाताचा हा व्हिडिओ एका वाटसरूच्या मोबाइल कॅमेराज कैद झाला. रेल्वे फाटकावर घडलेल्या या भीषण अपघाताचा व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल झाला असून अंगावर काटा आणणाऱ्या या भीषण अपघातानंतर प्रशासनालाही खडबडून जाग आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here