शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या मुख्याध्यपकांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये एका 15 वर्षीय शाळकरी मुलाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटना भोसरी येथील गव्हाणे वस्ती येथे 13 डिसेंबर रोजी घडली आहे. मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यपकांविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Pimpri Crime) आला आहे.

याबात मयत मुलाच्या आईने (वय-37) शनिवारी (दि.24) भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कूल (Priyadarshini English Medium School) मुख्याध्यापक हितेश शर्मा Hitesh Sharma (अंदाजे वय-40 रा. भोसरी) यांच्याविरुद्ध आयपीसी 305 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा दिघी रोड येथील प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिकत होता.
शाळेचे मुख्याध्यापक यांनी फिर्यादी यांचा मुलला शाळेत शिकत असताना मारहाण करतो,
शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करत नाही, शाळेतून रस्टिकेट करतो, शाळेत मुलाला पाठवू नका, असे बोलून त्याला शारीरिक व मानसिक त्रास दिला.
त्यामुळे मुलाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here