27.5 C
New York
Saturday, June 15, 2024

Buy now

पहिल्याच रात्री पत्नीची आपल्या पतीविरोधात पोलिसांत धाव

- Advertisement -

चंदीगड : लग्नानंतर पहिल्याच रात्री पत्नीने आपल्या पतीविरोधात पोलिसांत धाव घेतल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ही घटना हरियाणाच्या गुरुग्राममधील आहे. यात नवरीने आपल्या पतीवर अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
प्रकरण गुरुग्रामच्या सेक्टर १५मधील आहे. महिलेनं पोलिसांना सांगितलं, की तिचा पती अभिनव वशिष्ठ याने मधुचंद्राच्या रात्रीच तिच्यासोबत जबरदस्ती अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. पीडितेनं विरोध करताच पतीला तिला मारहाण केली.
पीडितेने सांगितलं की, तिने याबाबत सासूकडे तक्रार केली तेव्हा तिनेही आपल्या मुलाची बाजू घेतली.

- Advertisement -

तो कॅनडाहून आला आहे आणि तिथे हे सगळं सामान्य आहे, असं सासूने तिला सांगितलं. यानंतर पती तिला हनिमूनला मालदीवला घेऊन गेला. तिथेही त्याने पत्नीसोबत असंच कृत्य केलं. हे सगळं इथेच थांबलं नाही.

- Advertisement -

पतीने पत्नीला नशेच्या गोळ्या देऊन तिच्यासोबत घाणेरडं कृत्यही केलं. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, पतीच्या या सर्व कृत्यांमुळे व्यथित होऊन तिला त्याची भीती वाटू लागली. पण ती कोणालाच सांगू शकली नाही. यासोबतच पतीसह सासू, सासरेही तिच्याकडे हुंड्याची मागणी करतात.
पीडितेने सांगितलं की, जेव्हा हा प्रकार जास्तच वाढला तेव्हा तिने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पीडितेने पती अभिनव, सासू आणि सासरे यांच्याविरुद्ध सिव्हिल लाईन्समध्ये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles