रुग्णालयांमध्ये खाटा नाहीत, औषधे नाहीत, मृत्यूनंतर स्मशानभूमीतही जागा मिळत नाहीयेत पन कोरोना इथपर्यंत का पोहोचला नाही?

कोरोनाची सुरुवात चीनमधून झाली आणि आता पुन्हा एकदा याच देशातून कोरोना झपाट्याने वाढ घेत आहे.
रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत, उपचारासाठी औषधे नाहीत, मृत्यूनंतर स्मशानभूमीतही जागा मिळत नाहीयेत. दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. चीननंतर अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानमध्येही केसेस वेगाने वाढत आहेत. भारतामध्येही केंद्र आणि सर्व राज्य सरकारे अलर्टवर आहेत. पण जगात असाही एक देश आहे, जिथे महामारीच्या सुरुवातीपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही याला दुजोरा दिला आहे.

196 देशांपैकी एकमेव देश सुरक्षित राहिला
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या यादीतील 196 देशांपैकी एकच देश असा आहे, जिथे कोरोना पोहोचला नाही. तुर्कमेनिस्तान हे या देशाचे नाव आहे. WHO च्या अहवालानुसार, 3 जानेवारी 2022 ते 23 डिसेंबर 2022 पर्यंत तुर्कमेनिस्तानमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. येथे मोठ्या प्रमाणात लसीकरण कार्यक्रम राबविण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, 3 सप्टेंबर 2022 पर्यंत येथे एकूण 1 कोटी 35 लाखांहून अधिक लोकांना लसीचा डोस देण्यात आला आहे.

कोरोना इथपर्यंत का पोहोचला नाही?
2020 पासून म्हणजेच कोरोना चीनमधून जगभर पसरू लागला, तेव्हापासून तुर्कमेनिस्तानने सर्वप्रथम एअरलाइन्सवर लगाम घट्ट केला. महामारीच्या सुरुवातीला इथल्या सरकारने थायलंड आणि बीजिंगला जाणाऱ्या फ्लाइटवर बंदी घातली होती. इतकेच नाही तर सुरुवातीच्या टप्प्यातच तुर्कमेनिस्तानने चीन आणि थायलंडला विमाने पाठवून तेथील लोकांना बाहेर काढले होते. कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांची येथे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली आणि लोकांनीही ती स्वीकारली.

सर्व विमाने एकाच विमानतळावर आणली
तुर्कमेनिस्तानने फेब्रुवारी 2020 पासून जगातील कोणत्याही देशात जाण्यासाठी प्रवासावर बंदी घातली आहे. विशेषत: ज्या ठिकाणी कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. मार्चमध्ये तीन परदेशी मुत्सद्दींचे विमान तेथे पोहोचल्यावर तेही परत करण्यात आले. देशात येणारी सर्व अत्यावश्यक उड्डाणे एकमेव तुर्कमेनाबत आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आली. येथे येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ज्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे त्यांना विमानतळावरील खास बांधलेल्या रुग्णालयांमध्ये अलग ठेवण्यात आले होते.

लसीकरण मोहिम राबवली
तुर्कमेनिस्तानने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली. ज्या विमानांमध्ये मदत साहित्य आणि अत्यावश्यक लोक होते, अशा विमानांनाच देशात प्रवेश करण्याची परवानगी होती. मुख्य विमानतळ लोकसंख्येपासून दूर असल्याने संसर्ग शहरी लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून त्याच्या जवळ रुग्णालयांची व्यवस्था करण्यात आली होती. देशात एक विशेष वैद्यकीय गट तयार करण्यात आला, ज्याचे काम फक्त कोविडपासून बचावासाठी संपूर्ण व्यवस्था करणे हे होते. या गटाने आपली जबाबदारी तत्परतेने पार पाडली. जगभरात कोविडचे रुग्ण थांबल्यानंतर जेव्हा लसीची पाळी आली तेव्हा तुर्कमेनिस्तान सरकारने लसीबाबत तत्परता दाखवली. 3 सप्टेंबर 2022 पर्यंत येथे एकूण 1 कोटी 35 लाखांहून अधिक लोकांना लसीचा डोस देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here