25.8 C
New York
Saturday, June 15, 2024

Buy now

कारचा भीषण अपघात,दैव बलवत्तर मृत्यूला हुलकावणी

- Advertisement -

राज्यातील रस्ते अपघातांच्या वाढत्या प्रमाणामुळे आता चिंता वाढली आहे. वारंवार अतिवेग, ओव्हरटेकिंग, लेन कटिंग यामुळे अपघात होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे वाहनचालकांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी कडक शिस्त कशी लावली जाईल, या अनुषंगाने उपाययोजना करण्याचीही गरज आहे .

- Advertisement -

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी इथं भीषण अपघात घडला.
पण अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली. विशेष म्हणजे जी खासगी कार (Car Accident) पूर्णपणे उलटली होती, त्यामध्ये पाच प्रवासी होते. हे पाचही प्रवासी अगदी थोडक्यात बचावलेत. दैव बलवत्तर म्हणून या सगळ्यांनी अगदी थोडक्यात मृत्यूला हुलकावणी दिलीय.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी इथं होंडा कंपनीच्या एका खासगी कारचा अपघात झाला. ही कार भरधाव वेगात होती. कार चालक वेगाने गाडी चालवत होता. पण हा वेगच त्यांच्या जीवावर बेतण्याची वेळ ओढावली होती.

कार चालकाचं वेगावरील नियंत्रण सुटलं आणि अनर्थ घडला. कार रस्त्याच्या कडेला शेतात उलटली. हा अपघात इतका जबर होता की गाडीची चारही चाकं वर आणि गाडीचं संपूर्ण छत शेतात, अशी अवस्था झाली होती. खाली डोकं वर पाय केल्याप्रमाणे या कारचा भीषण अपघात घडला होता.

या अपघातानंतर कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. या कारमध्ये एकूण पाच जण होते. हे पाचही जण थोडक्याच वाचलेत. त्यातील काही जणांना किरकोळ दुखापत झालीय. तर काहींना जबर मार बसलाय. स्थानिकांनी या कारमधील प्रवाशांची मदत केली आणि जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

- Advertisement -

Related Articles

Latest Articles