माहेरी राहत असल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीचा गळा चिरून केली हत्या


आठ महिन्यांपासून माहेरी राहत असल्याने रागाच्या भरात पतीनं सासरवाडीत जाऊन तिची गळा चिरून हत्या केली या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

जालना : जालना तालुक्यातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंबेफळ गावात ही धक्कादायक घटना घडली. पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे.
आरोपी सासुरवाडीत आला. त्यानं पत्नीचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केला. रमाबाई लाला कदम असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या पतीनेच तिची गळा चिरून हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.

दोघांत वाद होत असल्याने आठ महिन्यांपासून रमाबाई माहेरी होती. त्याचवेळी आरोपी तिथे आला. रमाला घेऊन जायला आलोय असं त्यानं सांगितलं. सासू-सासरे शेतात जाताच आरोपीनं पत्नीवर शस्त्रानं वार केले. हत्या केल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पोहोचले.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

facebook sharing button

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here