भारत जोडो यात्रेला सध्या अपघाताचे ग्रहण दोन यात्रेकरूंना ट्रकने उडवले यामध्ये एकाचा मृत्यू
कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभारत निघालेल्या भारत जोडो यात्रेला सध्या अपघाताचे ग्रहण लागल्याचे यला मिळते. मागील काही दिवसांत कॉग्रेसच्या नेत्यांना धक्काबुक्की केल्याच्या घटना घडल्या.
यानंतर आता दोघांना ट्रकने उडवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गणेशन (62) आणि सययुल (30) अशी अपघातग्रस्त यात्रेकरुनची नावे आहेत.
गुरूवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास कॉग्रेसच्या भारत जोडो यात्रेतील गणेशन आणि सययुल या दोन यात्रेकरूंना ट्रकने उडवल्याची घटना घडली. यामध्ये गणेशन याचा मृत्यू झाला. तर सुययुल गंभीर जखमी आहे. या अपघातानंतर दोन्ही यात्रेकरूला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेत जखमी असलेल्या यात्रीची विचारपूस केली.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यातील गुरुवार हा चौथा दिवस होता. नवीन मोंढा परिसरात आयोजित जाहीर सभेनंतर भारत यात्री महादेव पिंपळगाव येथील कॅम्पकडे रवाना झाले. त्यावेळी रात्री 8:30 ते 9:00 वाजताच्या सुमारास महादेव पिंपळगाव परिसरात नांदेड-अकोला महामार्गावर पायी चालणाऱ्या तामिळनाडू राज्यातील गणेशन आणि सययुल या 2 यात्रेकरुना आयचरने धडक दिली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु गणेशनयांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या जखमी यात्रीवर उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आमदार मोहन हंबर्डे यांनी तात्काळ शासकीय रुग्णालय गाठले. रात्री 12:30 वाजेपर्यंत अशोकराव चव्हाण हे रुग्णालयात होते. परंतु, डोक्याला जबर दुखापत झालेल्या गणेशन या यात्रेकरूला वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले.
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या