क्राईमताज्या बातम्या

पत्नीसोबत ठुमके लगावल्याने पतीने टोकलं,आरोपीने त्याचं डोकंच फोडल नंतर काय?

जोधपुर : राजस्थानच्या जोधपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नकार्य सुरु असताना ही घटना घडल्याने कुटुंबात एकच खळबळ माजली आहे. लग्नाच्या संगीत कार्यक्रमामध्ये पत्नीसोबत ठुमके लगावल्याने पतीने टोकलं असता आरोपीने त्याचं डोकंच फोडून टाकलं आहे.
मुख्य म्हणजे या महिलेच्या पतीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. महामंदिर ठाण्याची ही घटना आहे.

रातानाडा हरिजन वस्तीमध्ये 6 नोव्हेंबर रोजी लग्नकार्य होतं. गल्लीमध्ये राहणारा शाहिल दारू पिऊन आला होता. दारूच्या नशेत हा व्यक्ती रोहनच्या पत्नीसोबत नाचू लागला. दरम्यान यावेळी तो अश्लील हातवारे आणि महिलेची छेडछाड करू लागला. डान्स करताना साहिलने फारच गलिच्छ हातवारे केले असता रोहन आणि इतरांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वांनी त्याला असं न करण्याचा सल्ला दिसला.

यानंतर दोघांमध्येही शाब्दिक बाचाबाची झाली आणि धक्काबुक्की झाली. यानंतर साहिल रागाच्या भरात त्याठिकाणहून निघून गेला. यानंतर दुसऱ्या दिवशी साहिलने रोहनची भेट घेतली. आणि रात्रीच्या घटनेबद्दल माफीही मागितली.

यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या वेळी साहिल त्याच्यासोबत काही लोकांसह इमारतीच्या बाहेर येऊन पोहोचला. यावेळी त्याने रोहनला बोलवून घेत त्याच्याशी वाद घातला. या वादावादीमध्ये साहिलने त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला. यामध्ये रोहन गंभीर जखमी झाला.

या मारहाणीनंतर रोहनच्या भावाने रोहनला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं. यावेळी त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. याप्रकरणी सर्व माहिती पोलिसांना देण्यात आली. उपचारादरम्यान पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास रोहनचा मृत्यू झाला.

एसएचओ हरीश सोलंकी यांनी सांगितलं की, मुख्य आरोपी साहिल तसंच विक्रम यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button