डाॅ.अशोक बांगर यांची नेकनुर कुटीर रूग्णालयातील नियुक्ति रद्द; आंदोलनाचे यश – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

अखेर डाॅ.अशोक बांगर यांची नेकनुर कुटीर रूग्णालयातील नियुक्ति रद्द; आंदोलनाचे यश:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
____
महिलांशी असभ्य वर्तन प्रकरणात दोषीसिद्ध डाॅ.अशोक बांगर यांची नेकनुर कुटीर रूग्णालयातील आयुष विभागातील नियुक्ति रद्द करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२ नोव्हेंबर रोजी नेकनुर कुटीर रूग्णालय येथे ठीय्या आंदोलन करण्यात आले होते.आंदोलनात संतोष भोसले,संजय खामकर,आनिल माने,गौतम घडशिंगे, प्रदिप वाघमारे;अमोल खामकर आदि सहभागी झाले होते. डाॅ.सुरेश साबळे यांच्या ४-५ दिवसात मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. अखेर आज दिनांक.१० नोव्हेंबर रोजी डाॅ.सुरेश साबळे यांनी अजित पवार यांच्या टीपन्नीवरून वरून डाॅ.अशोक बांगर यांची पुन्हा उपजिल्हारुग्णालय गेवराई येथे रूजु होण्याचे आदेश दिले आहेत.

तुकाराम मुंढे यांच्या प्रतिनियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयामुळे ओढावला होता पेचप्रसंग
____
संचालक आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बीड जिल्ह्य़ातील आरोग्य विभागातील वैद्यकीय आधिका-यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्यात याव्यात या आदेशानंतर डाॅ.सुरेश साबळे यांनी उपजिल्हारुग्णालय गेवराई येथे प्रतिनियुक्तीवरील डाॅ.अशोक बांगर यांची कुटीर रूग्णालय नेकनुर येथील मुळ पदावर नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळेच पेचप्रसंग ओढावला होता परंतु नेकनुरकर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर अखेर नेकनुर कुटीर रूग्णालयातील नियुक्ती रद्द करण्यात आली.

अड. संगीता धसे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर गेवराई उपजिल्हारुग्णालयात नियुक्ति
___
फेब्रुवारी महिन्यात एका महिलेने नेकनुर कुटीर रूग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डाॅ.अशलाक शिंदे यांच्या समोर डाॅ.अशोक बांगर यांनी गैरवर्तन केल्याबद्दल तक्रार केल्यानंतर विविध दैनिकातुन बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अड.संगीता धसे यांच्या नेतृत्वाखाली दि.२५ फेब्रुवारी रोजी जिल्हारूग्णालय बीड येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते आंदोलनात डाॅ.गणेश ढवळे,स्वप्नील गलधर,शेख युनुस,शेख मुबीन,राऊत,किस्किंदाताई पांचाळ,अश्विनी झणझणे,वर्षाताई कुलकर्णी,विद्या सेलुकर,शुभांगी कुलकर्णी,आदिंनी सहभाग घेतला होता. त्यानंतर डाॅ.सुरेश साबळे यांना निवेदन दिल्यानंतर त्रिसदस्यीय समितीद्वारे चौकशी समितीत दोषी आढळल्यानंतर अजित पवार यांच्या टीपन्नीवरून उपजिल्हारुग्णालय गेवराई याठिकाणी नियुक्ती देण्यात आली होती.

डाॅ.अशोक बांगर अजित पवार यांचे जावई आहेत काय??:- अड.संगीता धसे
___
महिलांशी गैरवर्तन या सारख्या अक्षम्य गुन्ह्यात दोषी आढळलेल्या व प्रतिष्ठित वैद्यकीय पेक्षाला बदनाम करणा-या डाॅ.अशोक बांगर यांचे निलंबन करण्याऐवजी नेकनुर कुटीर रूग्णालय येथुन उपजिल्हारुग्णालय गेवराई याठीकाणी नियुक्ति देणारे अजित पवार मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांना महिलांच्या प्रश्नांविषयी गांभीर्य नसुन निलंबना ऐवजी ईतरत्र नियुक्ति करताना गेवराई येथील महिलांच्या सुरक्षिततेची हमी अजित पवार घेणार का??डाॅ.अशोक बांगर हे त्यांचे जावई आहेत का??असा संतप्त सवाल केला आहे.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here