8.4 C
New York
Thursday, March 28, 2024

Buy now

दोघांकडून हिऱ्याच्या दागिन्यांसह सोन्या, चांदीचा ऐवज असा १ कोटी १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

- Advertisement -

पुणे : हिऱ्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोन जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. ताब्यात घेण्यात आलेले दोघे मेहुणा आणि मेहुणी असल्याची माहिती समोर आली आहे.
तर संशय येऊ नये म्हणून हे दोघे चोरी करण्यासाठी अलिशान कार वापरत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या काळात कर्वेनगर भागात असणाऱ्या एका बंगल्यात चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एक पुरुष आणि एक महिला संशयितरित्या त्या भागात फिरताना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी राजू कालमेध (४५) याला ताब्यात घेतले असता. त्यानंतर त्याने ही चोरी त्याची मेहुणी सोनिया पाटील (३२) हिच्या सोबत केली असल्याची कबुली दिली. या दोघांकडून हिऱ्याच्या दागिन्यांसह सोन्या, चांदीचा ऐवज असा १ कोटी १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, चोरी करण्यासाठी हे दोघेजण अलिशान गाडी वापरत असत. तर चोरी करण्यासाठी उच्चभ्रू परिसर निवडायचे. सकाळी ते चोरी करण्यासाठी निवडण्यात आलेल्या बंगल्याची रेकी करत असत तर रात्री बंगल्यात डाका टाकत असत. तर त्यांच्या गाडीत घराचे दरवाजा उघडण्यासाठी वापरण्यात येणारे विविध प्रकारचे screwdriver सापडले आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तर कालमेधवर या आधी बोरिवली, वापी, अमरावती येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती असून पुढील तपास पोलीस करत आहेत

- Advertisement -

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

- Advertisement -

Related Articles

Latest Articles