इलेक्ट्रॉनिक लॉकर तोडून तब्बल साठ लाख रुपयांचे सोने आणि तेरा लाख रुपये लंपास

नागपूर : नागपूरात मुलानेच स्वतःच्या घरात तब्बल 73 लाखाची चोरी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नागपूरातील शांतीनगर भागात इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक जावेद थारा यांच्या घरात हा प्रकार घडला आहे.
रात्री लग्न समारंभावरून घरी परतले. त्यावेळी त्यांनी घरात चोरी झाल्याचं निदर्शनास आले. चाेरट्यांनी इलेक्ट्रॉनिक लॉकर तोडून तब्बल साठ लाख रुपयांचे सोने आणि तेरा लाख रुपये चोरुन नेले हाेते.
घटनेच्या तपासात क्राईमब्रांचच्या युनिटने दुकानातील कर्मचाऱ्यांला पोलिसी खाक्या दाखवला. तेव्हा मुलगा जाफरने घरात पैसे चोरुन दुबईला जाण्याची याेजना आखल्याची माहिती समाेर आली.
त्यानंतर पाेलिसांनी जावेद यांचे मुलगा जाफर आणि वाजीद वल्द गफ्फुर अली या दाेघांना अटक (arrest) केली. पोलिसांनी त्याच्यांकडून (73 लाखाचा) मुद्देमला जप्त केला आहे. या प्रकरणाचा सखाेल तपास सुरु असल्याची माहिती चिन्मय पंडित (पोलीस उपआयुक्त, क्राईम ब्रांच) यांनी दिली

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here