व्यापारी महेंद्र शांतिलाल बोरा यांचा अपघाती मृत्यू

आष्टी : जामखेड-बीड-अहमदनगर महामार्गावर आज सकाळी पोखरी गावाजवळील धोकादायक वळणावर पुलावरून कार कोसळून भीषण अपघात झाला. यात जामखेड येथील व्यापारी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून महेंद्र बोरा यांचा मृत्यू झाला.
जामखेड शहरातील भांड्याचे व्यापारी महेंद्र शांतिलाल बोरा कुटुंबासमवेत राजस्थानला देवदर्शनाला गेले होते. मंगळवारी रात्री विमानाने बोरा कुटुंब पुणे विमानतळावर आले. तेथून स्वतःच्या कारने (एम. एच.१६ ए. टी ८८०७ ) सर्वजण आज पहाटे जामखेडकडे निघाले होते. दरम्यान, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ड्रायव्हरला पोखरीजवळ सोडून बोरा यांचा मुलगा भूषण गाडी चालवत होता. काही अंतर पुढे जाताच धोकादायक वळणावर टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली कार पुलावरून खाली कोसळली.

अपघातात महेंद्र बोरा यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील पत्नी रेखा महेंद्र बोरा (५२), सून जागृती भूषण बोरा ( २८), नात लियाशा भुषण बोरा (६) हे गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक फौजदार नामदेव धनवडे, पोका भरत गुजर, बी. ए. वाणी यांनी भेट देऊन पंचनामा केला. जखमींना तातडीने जामखेड येथे आरोग्य केद्रात दाखल करण्यात आाले

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here