पळवून नेलेली मुलगी तत्काळ परत आली नाही तर कोल्हापूरमद्धे तांडव होईल

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

देशभरात ‘लव जिहाद’शी संबंधित प्रकरणं खूप गाजत आहेत. महाराष्ट्रातूनही अशी प्रकरणं समोर येत आहेत. कोल्हापुरात लव जिहाद सारखा प्रकार घडला आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.
पोलिस नीट तपास करत नसल्याचा आरोप करत आज आमदार नितीश राणे यांनी कोल्हापुरात ठिय्या आंदोलन केलं आहे.

याच कथित लव्ह जिहाद प्रकरणी भाजपचे आमदार नितीश राणे यांनी कोल्हापुरात ठिय्या आंदोलन केलं आहे. कोल्हापूरमद्धे लव्ह जिहाद आणि धर्मांतर असे प्रकार सुरू असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. कोल्हापूरमद्धे कथित लव्ह जिहाद प्रकरणी मोर्चा काढण्यात आला होता. हिंदू मुलींकडे पाहिल्यास डोळे काढू असा इशारा राणे यांनी दिला आहे.
कोल्हापूरमद्धे अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा प्रकार घडल्यामुळे हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. पळवून नेलेली मुलगी तत्काळ परत आली नाही तर कोल्हापूरमद्धे तांडव होईल असा इशारा राणे यांनी दिला आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या अधिवेशनामद्धे धर्मांतर विरोधी कायदा आणावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पुढे बोलताना राणे म्हणाले की, अशा गोष्टी वेळीच थांबवल्या नाहीत तर आम्ही गप्प बसणार नाही. वाईट नजरेने पाहिल्यास आम्ही तुमचे डोळे काढून हातात देऊ. कोणताही नेता आणि कोणताही माणूस तुम्हाला वाचवायला येणार नाही. हे पण मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. म्हणून येणाऱ्या अधिवेशनामद्धे असा अभ्यास चालू आहे की, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश सारखं सक्षम किंवा चांगला धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रामद्धे आणावा तोही डिसेंबरमध्ये होणाऱ्या अधिवेशनामद्धे आणावा त्यानंतर हे सर्व प्रकार बंद होतील अशी मागणी नितीश राणे यांनी केली आहे.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here