पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर रॅलीमध्ये गोळीबार

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

कराची:पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Imran Khan Ex Prime Minister Imran Khan) यांच्या गुजरानवाला या ठिकाणच्या रॅलीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या लाँग मार्चदरम्यान गुरुवारी गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार इम्रान खान आणि त्यांचे चार समर्थक जखमी झाले आहेत.
त्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांचे चार समर्थकही जखमी झाल्याचे वृत्त आहे. गोळीबार करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

‘डॉन न्यूज’च्या वृत्तानुसार, इम्रान ज्या कंटेनरवरून लाँग मार्च काढत आहे. त्याच्या जवळून गोळीबार झाला. हे पंजाबच्या वजिराबाद भागात येते. शाहबाज शरीफ सरकारचा राजीनामा आणि तात्काळ सार्वत्रिक निवडणुकांच्या मागणीसाठी इम्रान यांनी गेल्या आठवड्यात लाँग मार्च सुरू केला होता. या लाँग मार्चच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एका महिला पत्रकारासह तीन जणांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here