19.1 C
New York
Sunday, May 26, 2024

Buy now

अंधेरी निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाकडून देखील उमेदवार उभा करण्याची शक्यता

- Advertisement -

मतदार संघाची मतदार संख्या, भाषिक रचना? या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 2 लाख 71 हजार 668 इतकी आहे. यापैकी पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 46 हजार 780 तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 24 हजार 887 इतकी आहे. एका तृतीयपंथी मतदाराचा समावेश या मतदारसंघात होतो. या मतदारसंघात उत्तर भारतीय आणि मराठी भाषिक मतदारांचे (North Indian and Marathi speaking voters) समसमान प्रमाण आहे. त्या पाठोपाठ मारवाडी, गुजराती आणि जैन समाजाचे लोक या मतदारसंघात आढळतात.

- Advertisement -

मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ( Andheri East Assembly Elections ) एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) गटाकडून देखील उमेदवार उभा करण्याची शक्यता, आतापर्यंत ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष ( Thackeray vs BJP ) पाहायला मिळाल्यानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे गट ( Thackeray vs Shinde group ) असा सामना या निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता, ठाकरे गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानंतर शिंदे गट देखील ही प्रतिष्ठेची निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती.
मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ( Andheri East Assembly Elections ) एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) गटाकडून देखील उमेदवार उभा करण्याची शक्यता, आतापर्यंत ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष ( Thackeray vs BJP ) पाहायला मिळाल्यानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे गट ( Thackeray vs Shinde group ) असा सामना या निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता, ठाकरे गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यानंतर शिंदे गट देखील ही प्रतिष्ठेची निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती.

- Advertisement -

तीन नोव्हेबरला निवडणुक – अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणूक ( Andheri Assembly Constituency ) येत्या तीन नोव्हेबरला होणार आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके ( Late Shiv Sena MLA Ramesh Latke ) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर होणारी निवडणूक ( Andheri Election ) अत्यंत चुरशीची असणार आहे. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप ( Shiv Sena vs BJP ) अशी थेट लढत असली तरी शिवसेनेतील फुटीर शिंदे गटाची भाजपा उमेदवाराला मदत होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला कडवी झुंज द्यावी लागणार आहे. मुंबईतील अंधेरी विधानसभा मतदारसंघ ( Andheri Assembly Constituency ) दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे घेण्यात येणाऱ्या पोटनिवडणुकीत ( Andheri Assembly Election ) शिवसेना चुरशीने लढणार आहे. मोठमोठ्या सभा घेण्याऐवजी प्रत्यक्ष मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर शिवसेनेचा भर ( Shiv Sena contact voters directly ) असणार आहे. रमेश लटके यांचे मतदारसंघातील काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही रणनीती आखल्याचे शिवसेनेचे नेते, माजी मंत्री अनिल परब ( Anil Parab ) यांनी सांगितले.

सेना विरुद्ध भाजप सामना – दिवंगत आमदार रमेश लटके (ramesh latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक जाहीर झाली आहे.(Andheri by poll election). शिवसेनेची या मतदार संघावर मजबूत पकड आहे. आता होणाऱ्या पोट निवडणुकीत भाजपने मुरजी पटेल यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र या निवडणूकीत शिवसेनेचे पारडे जड असून लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेला ( Rituja Latke ) मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता वतर्वली जात आहे. ( shiv sena favorite in andheri by poll election ).

सर्वसमावेशक मतदारसंघ – अंधेरी पूर्वेकडील साकीनाका ते महाकाली गुंफा परिसर, अंधेरी एमआयडीसी, वीर नेताजी पालकर चौक, गुंदवली, एसिक रुग्णालय, भवानी नगर, विजय नगर, लार्सन अँड टुब्रो पॉवर कॉम्प्लेक्स, पवईचा काही भाग, अंधेरी-कुर्ला रोड, पश्चिम द्रुतगती महामार्गालगतचा भाग या मतदारसंघात येतो. कोकणातील मंडळी या भागात मोठ्या संख्येने राहतात. मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग याशिवाय सामाजिक व आर्थिक कारणांमुळे झोपडपट्टीत राहणारा वर्गही या ठिकाणी बऱ्यापैकी आहे. एका अर्थाने कॉस्मोपोलिटन चेहरा असलेल्या या मतदारसंघात उत्तर भारतीय आणि देशभरातील विविध प्रांतातून आलेली मंडळी गुण्यागोविंदाने राहत आहेत. काँग्रेसचा परंपरागत मतदार या भागात असला तरी मुंबईच्या राजकारणाचा बदलत्या काळात या भागात सत्ताधारी शिवसेना रुजली आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला – एकेकाळी काँग्रेसचे वर्चस्व या मतदार संघात होते. मात्र, आता काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. शिवसेनेने विकासकामांच्या जोरावर गेल्या दहा वर्षांपासून येथे पाय रोवले आहेत. भाजपा कॉंग्रेसमधून आलेल्या मुरजी पटेल यांच्या माध्यमातून मतदार संघावर आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मागील विधानसभा निवडणूकीत पराभव पत्कारावा लागल्यानंतर येत्या विधानसभेच्या पोट निवडणुकीत मुरजी पटेल पुन्हा नशीब आजमवणार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती होती. आता मतांचे विभाजन होणार आहे. परंतु, हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून रमेश लटके यांच्या निधनामुळे सहानुभूतीच्या लाटेचा लाभ ऋतुजा लटके ( Rituja Latke ) यांना होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles