भीषण आग डॉक्टरसह मुलगा आणि मुलगी तिघांचा मृत्यू

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

आंध्र प्रदेशातील तिरुपतीजवळील भगतसिंग नगर येथील एका तीन मजली इमारतीला रविवारी भीषण आग लागली. या भीषण आगीत डॉक्टरसह त्याचा मुलगा आणि मुलगी अशा एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे.
याशिवाय अन्य दोघे भाजले आहेत. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दुपारी ४.३० च्या सुमारास आग लागली, असे पोलिसांनी सांगितले. इमारतीच्या तळमजल्यावर डॉक्टरांचे क्लिनिकही आहे.

मृत तिघांची ओळख पटली आहे. या घटनेत डॉ. रविशंकर रेड्डी आणि त्यांचा मुलगा सिद्धू (१२) आणि मुलगी कार्तिक (६) यांना जीव गमवावा लागला आहे. तिघांनाही उपचारासाठी दुस-या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. आगीमुळे तिघेही मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. त्यामुळे त्यांना वाचवता आले नाही.

अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून डॉक्टरांच्या पत्नी डॉ. अनंत लक्ष्मी आणि आई रामासुब्बम्मा यांची सुटका केली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आगीचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, सर्व मृतदेह तिरुपती येथील सरकारी रुईया रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here