क्रिकेटच्या मैदानातून एक मोठी बातमी हाती येतेय. हैदराबादमध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus 3rd T20I) तीन सामन्यांच्या शेवटच्या आणि अखेरच्या टी-20 ( Team India ) मध्ये टीम इंडियाचा सहा विकेट्सनं विजय झालाय.
टीम इंडियाला शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती. त्यावेळी विराट कोहली आणि हार्दिक पांड्या क्रीजवर होते. डॅनियल सॅम्स गोलंदाजी करत होता. कोहलीनं पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. दिनेश कार्तिकने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. भारताला शेवटच्या तीन चेंडूत चार धावा हव्या होत्या. त्याचवेळी चौथ्या चेंडूवर हार्दिकला एकही धाव करता आली नाही. पाचव्या चेंडूवर सॅम्सनं वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू हार्दिकच्या बॅटला लागला आणि फोर गेला. यावेळी टीम इंडियानं तीन सामन्यांच्या सीरिजमध्ये मोठा विजय मिळवलाय.
33 वे अर्धशतक
विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय T20 कारकिर्दीतील 33 वे अर्धशतक झळकावलंय. त्यानं ते 37 चेंडूत पूर्ण केलंय.
2013 पासून ऑस्ट्रेलियाला टी-20 मालिकेत पराभव पत्करावा लागला नव्हता.
2007 आणि 2013 मध्ये त्यांनी प्रत्येकी एक सामन्याची मालिका जिंकली.
आता टीम इंडियाला नऊ वर्षानंतर प्रथमच कांगारूंना त्यांच्या घरच्या मालिकेत पराभूत करण्यात यश आलंय.
2017-18 मध्ये ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली आणि 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियाने 2-0 ने जिंकली.
ऑस्ट्रेलियानं भारतासमोर 187 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ऑस्ट्रेलीयानं नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 186 धावा केल्या. कॅमेरून ग्रीननं 21 चेंडूत 52 तर टीम डेव्हिडने 27 चेंडूत 54 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून अक्षर पटेलनं तीन बळी घेतले. ग्लेन मॅक्सवेलही धावबाद झाला. डॅनियल सॅम्स 20 चेंडूत 28 धावा करून नाबाद राहिला. या लक्षाचा पाठलाग करून अखेर टीम इंडियानं विजय सीरिज आपल्या नावार केलाय.