ताज्या बातम्यापरळीबीड जिल्हा

समाजोपोयोगी उपक्रमांनी साजरा होणार हाळम फेस्टिवल-माधव मुंडे


समाजोपोयोगी उपक्रमांनी साजरा होणार हाळम फेस्टिवल-माधव मुंडे

हाळम फेस्टिव्हलच्या सार्वजनिक दुर्गा महोत्सवाच्या अध्यक्षपदी संतोष मुंडे तर सचिवपदी गोविंद दहिफळे यांची निवड

परळी वैजनाथ : तालुक्यातील मौजे हाळम येथे गेल्या 17 वर्षापासुन हाळम फेस्टिव्हलच्या माध्यमातून सामाजिक , अध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक क्षेत्रात आपल्या कार्यक्रमाने आगळा वेगळा ठस्सा उमटवणारा हाळम फेस्टिव्हलची यावर्षीची हाळम फेस्टिव्हल सार्वजनिक दुर्गा महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी संतोष मुंडे तर सचिवपदी गोविंदा दहिफळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. हाळम फेस्टिवल यावर्षी समाजोपोयोगी उपक्रमांनी साजरा होणार असल्याची माहिती संस्थापक तथा युवा नेते ग्रामपंचायत सदस्य माधव मुंडे यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात दिली.

गेल्या 17 वर्षापासून ग्रामीण भागात अखंडपणे साजरा होणारा लोकोपयोगी महोत्सव म्हणजे परळी तालुक्यातील हाळम फेस्टिवल आहे. आदिशक्ती आदिमायेचा उत्सव हळम मध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक आध्यात्मिक आरोग्य विषयक उपक्रम राबवून हा महोत्सव लोकोपयोगी केला आहे. ही परंपरा कायम ठेवण्याचे काम संस्थापक युवा नेते माधव मुंडे यांनी सातत्यात ठेवून एक वेगळा पायंडा पाळला आहे.
हाळम येथे हाळम फेस्टिव्हलचे संस्थापक तथा युवा नेते माधव मुंडे यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुर्गोत्सव मंडळाची कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. हाळम फेस्टिव्हल तब्बल 17 वर्षांपासून ग्रामीण भागातील नागरिकांना कार्यक्रमांची रेलचेल देत आहे. महोत्सवात संस्कृतीक, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, सांप्रदायिक, मनौरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *