7.7 C
New York
Friday, April 19, 2024

Buy now

पंधराशे रुपयांची लाच स्वीकारताना बीड लाचलुचपत विभागाच्या पथकाने महिला वकिलाला रंगेहात पकडले

- Advertisement -

धारूर : धारुरमध्ये लाचलुचपत विभागाने एका महिला सहाय्यक सरकारी वकिलावर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई केली. पंधराशे रुपयांची लाच स्वीकारताना बीड लाचलुचपत विभागाच्या पथकाने आरोपीस रंगेहात पकडले.

- Advertisement -

ही कारवाई मंगळवारी (२० सप्टेंबर) दुपारी धारूर न्यायालयात करण्यात आली.

- Advertisement -

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुरेखा लांब (वायबसे) या कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एका तक्रारदाराकडे निकालाची प्रत देण्यासाठी पंधराशे रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारत असताना धारुर न्यायालयात लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) पोलीस उपाधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक रविंद्र परदेशी व त्यांच्या पथकाने केली.

तालुक्यामध्ये लाच घेण्याचे प्रकार वाढत आहेत. मागील काळात धारूर पोलीस स्टेशन अंतर्गत आडस येथील पोलीस कर्मचाऱ्यावर मदत करण्यासाठी लाच स्वीकारताना पोलीस शिपायास ताब्यात घेतलेली घटना ताजसतानाच 20 सप्टेंबर रोजी सकाळी न्यायालयामध्ये सरकारी वकीलाला लाच स्वीकारताना रंग हात पकडले.

Related Articles

Latest Articles