डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आधी पक्ष जाहीर करावा – सलीम जहाँगीर

डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आधी पक्ष जाहीर करावा आणि मग मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांना आणावे – सलीम जहाँगीर

बीडवासियांसाठी पंकजाताईंनी मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणला

बीड – शहरातील रस्त्यांसाठी 70 कोटी रुपयांचा निधी आणल्यावरून दोन क्षीरसागरांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आमदार आणि डॉ. योगेश क्षीरसागर दोघेही निधीचे श्रेय घेत आहेत. भाजप नेत्या तथा तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी रस्त्यांसाठी 506 कोटी , जिल्हा रुग्णालयासाठी 200 कोटी , अमृत अटल योजनेसाठी केंद्राकडून तर माता बाल रुग्णालयासाठी 20 कोटी रुपयांचा निधी आणला.मात्र त्यांनी कधीच श्रेय घेतले नाही. ताईंनी आणलेल्या निधीवरून श्रेय घेण्यात दोन्ही क्षीरसागर पुढे असतात. मात्र डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आधी ते कोणत्या पक्षात आहेत हे जाहीर करावे आणि मगच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना रस्ता कामाच्या शुभारंभासाठी आणावे असे भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे.

बीड जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी बीडच्या नागरिकांकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या माध्यमातून प्रचंड निधी आणला. रस्त्याकरिता 506 कोटी तर अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला जिल्हा रुग्णालयाच्या वाढीव खाट इमारतीचा प्रश्न मार्गी लावून त्याला दोनशे कोटी निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर बीड शहरामध्ये केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या अमृत अटल योजनेतील भुयारी गटार योजनेसाठी 206 कोटीची उपलब्ध करून घेतला. विकासाचे असे अनेक प्रश्न पंकजाताई मुंडे आणि खा. प्रितम ताई मुंडे यांनी मार्गी लावले. बीडमधील जालना रोडचा प्रश्न देखील खा. प्रितमताईंनी केंद्रात पाठपुरावा करून मार्गी लावला. मात्र त्यांनी कधीही श्रेय घेण्याचे पत्रक सुद्धा काढले नाही. परंतु आज 70 कोटीच्या निधीसाठी आ. संदीपभैया आणि डॉ. योगेश भैया यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.
बीडच्या विकासाकरिता निधी आम्ही आणायचा, काम देखील आम्ही करायचे आणि श्रेय घेण्यासाठी दोन्ही क्षीरसागर पुढे येतात अशी अनेक उदाहरणे आहेत. डॉ.योगेशभैया आपण वर्षभरात तीनदा पक्ष बदलले आहेत. राष्ट्रवादी , शिवसेना आणि आता नगरपालिकेसाठी आघाडीच्या हालचाली मग आता नेमके कुठे जायचे या स्थितीत आपण आहात परंतु हा सर्व खटाटोप फक्त सत्तेच्या मोहासाठी सुरू आहे हे आता जनतेच्या लक्षात आले असून पक्ष अदलाबदलीचा हा खेळ प्रत्येकजण ओळखून आहे. त्यामुळे येणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत जनताच आपल्याला धडा शिकवेल असेही भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here