बीड ११० कोटींच्या बोगस खरेदी बाबत; ईडीकडे तक्रार

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

जनता जीवन- मरणाच्या दारावर असताना जिल्हा रुग्णालयात
११० कोटींच्या बोगस खरेदी बाबत; ईडीकडे तक्रार
मुख्य सूत्रधार सुखदेव राठोड,जयश्री बांगर,गणेश बांगर,राजरतन जयभाय, डॉ. सूर्यकांत गित्ते, आदिनाथ मुंडे,तानाजी ठाकर,शेख रियाज,शेख एजाज आदींवर गुन्हा नोंद करण्यात यावा यासाठी ईडीकडे दीपक थोरातांनी केली तक्रार

 

बीड : मुख्य सुत्रधार डॉ.सुखदेव राठोड अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्ससक केलेल्या घोटाळ्या संदर्भात बीड जिल्हा रुग्णालयातील साहित्य खरेदी तथा उर्वरित देयके अदा करण्यात येऊ नये चौकशी करून देयके अदा करावी तसेच 285 कोटी रूपये पेक्षाही जास्त खर्च दाखवून शासनाची फसवणूक केली आहे व बीड जिल्हा रुग्णालयातील कोवीड काळात फक्त कागदावरच 110 कोटी रुपयांपेक्षा ही जास्त साहित्य खरेदीत व रेमडेसिव्हर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणी गुन्हा दाखल का केला जात नाही तथा कोवीड काळात कंत्राटी कर्मचारी बोगस भरती प्रक्रिया व माहिती अधिकार कायद्याच्या अर्जावरील माहितीसह दिली जात नसल्याने व अन्य प्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करवा अशी मागणी ईडीकडे दीपक थोरात यांनी केली आहे. सदरील प्रकरणाची मी जिल्हा रुग्णालय ते राज्याच्या मंत्रालयापर्यंत सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट् शासन, बीड जिल्हा अधिकारी, पोलीस अधिक्षक, जिल्हा शल्य चिकितसक सह अन्य महत्वाच्या कार्यालयाकडे व विभागाकडे तक्रार केली असता मला फक्त मिटवुन घे या मध्ये राजकारण आहे. तुझ्या फायद्याचे आहे. म्हणुन माझ्यावर दबाव आणला जात आहे. मला योग्य तो न्याय मिळावा हिच अपेक्षा.
महोदय,
वरील विषय विनंतीपूर्वक आपणास पत्र लिहिण्याचे कारण (1)बीड जिल्हा रुग्णालयात कोवीड कार्यकाळ 1 जानेवारी 2019ते 14जानेवारी 2022 पर्यंत कोवीड कार्य काळामध्ये ज्या साहित्याची खरेदी केली यामध्ये धक्कादायक म्हणजे हे की संबंधित जिल्हा रुग्णालयातील काही कर्मचारी हेच गुतेदार आहेत जे की डॉक्टरसह औषध भांडार प्रमुख हेच साहित्य खरेदीत भागीदारी करून स्वतःची आर्थिक पोळी भाजून घेतली आहे
(2)यामध्ये बीड जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी प्रमुख महिला डॉक्टर कर्मचारी नामे रोहिणी ताई बांगर व त्यांचा भाऊ गणेश बांगर व बडतर्फ औषध भांडारचा कर्मचारी माजी औषध भांडार प्रमुख राजरतन जायभाय यांनी तत्कालीन जिल्हाशल्य चिकित्सक डॉ सुर्यकांत गिते विद्यमान एसिएस डॉक्टर सुखदेव राठोड तत्कालीन औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंढे विद्यमान औषध भांडार प्रमुख तानाजी ठाकर विद्यमान औषध भांडार प्रमुख शेख रियाज विद्यमान औषध भांडार प्रमुख शेख एजाज अली यांना हाताशी धरून सुमारे 110 कोटी रुपयांच्या खरेदी बोगस पद्धतीने तयार करून अव्वाच्या सव्वा भाव लावून संबंधित 110 कोटी रुपयांची खरेदी करीत असताना स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने असलेल्या बोगस एजन्सीच्या नावाने खरेदी दाखवण्यात आली आहे
(3 )संबंधित खरेदी करीत असताना बाहेरच्या एकाही एजन्सीला संधी दिलेली नाही व एकाही वर्तमानपत्रात दैनिकात पेपर मध्ये जाहिरात दिलेली नाही व याची टेंडर प्रक्रिया काढीत असताना सुद्धा टेंडर प्रक्रिया काढली नाही यांनी संबंधित आदेशाची प्रत तत्कालीन जिल्हा अधिकारी तथा तत्कालीन शल्यचिकित्सक विद्यमान आर एम ओ डॉ सुखदेव राठोड तत्कालीन औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे विद्यमान औषध भांडार प्रमुख तानाजी ठाकर शेख एजाज अली औषध भांडार प्रमुख शेख रियाज यांनी संगनमत करून रक्तपेढी प्रमुख डॉक्टर रोहिणी ताई बांगर व त्यांचा भाऊ राजरतन जायभाय यांनी फक्त कागदावर खरेदी करून यामध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर केली असून यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे(
4) संबंधित विषयावर मी दिपक थोरात राहणार थोरातवाडी जुने एस पी ऑफिस बीड एक सामाजिक कार्यकर्ता असून मी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली असताना माझ्यावरती दबाव आणला जात आहे या प्रकरणी मी पोलिस उपाधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे या अगोदर मला रेमडेसिव्हर इंजेक्शन संदर्भात धमक्या आलेल्या आहेत तरी या प्रकरणांमध्ये जे जे माहितीचे अधिकार आज पर्यंत मी दिलेले आहेत त्या एकाही अर्जावर माहिती अधिकारी डॉ सुखदेव राठोड यांनी उत्तर दिले नाही(
5) म्हणून अपिलीय माहिती अधिकारी तथा बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे साहेब यांच्या दालनात अपिलीय माहिती अर्जावर माहिती अधिकार कायद्यात अन्वे सुनावणीसाठी ला 1/9/ 2021 रोजी दुपारी चार वाजता संबंधित सात माहिती अधिकाराच्या वेगवेगळ्या मुद्द्यानुसार प्रत्येक अर्जावर वर सुनावणीसाठी बोलावण्यात आले या ठिकाणी अतिरिक्त जिल्हाचिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड बीड जिल्हा रुग्णालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी आर डी कुलकर्णी डॉक्टर महेश माने वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय बीड औषध भांडार प्रमुख तानाजी ठाकर औषध भांडार प्रमुख एजाज अली शेख रियाज हे उपस्थित होतेअपिलीय माहिती अधिकारी डॉक्टर सुरेश साबळे साहेब यांच्यासमोर अपीलावर सुनावणी झाल्याच्या नंतर पुढील पंधरा दिवसांमध्ये ते एक महिन्यांमध्ये संबंधित विभागाची माहिती दिली जाईल असे मला तोंडी सांगण्यात आले व संबंधित रजिस्टरवर सुनावणीला हजर असल्याबाबत माझी एका कागदावर सही घेण्यात आली व त्या ठिकाणी काही माहिती अशी दिली होती की त्यामध्ये संबंधित माहिती संदर्भात एकही कागद नव्हता म्हणून मी त्यांना एक लेखी अर्ज दिला की ही माहिती मला मान्य नाही ही माहिती दिशाभूल करणारी आहे व मी मागितलेल्या माहिती अधिकार अर्जाशी संबंधित नाही मला मान्य नाही तर अधिकारी डॉक्टर सुरेश साबळे यांनी लवकरच माहिती तुला देण्यात येईल असे सांगितले(६) तर संबंधित दोषी अधिकारी यांना विचारणा केली असता बीड जिल्हा रुग्णालयातील कोवीड कार्य काळामधील कामकाजाचा ताण जास्त आहे मनुष्यबळ अपुरे पडत असल्यामुळे येणाऱ्या 15 ते 45 दिवसांमध्ये माहिती दिली जाईल असे मला सांगितले व नंतर मला कसल्याही प्रकारचा पत्रव्यवहार किंवा लेखी स्वरुपात माहिती देण्यात आलेली नाही संबंधित आज पर्यंत दिलेल्या जवळपास पंधरा माहिती अधिकार यापैकी फक्त एका माहिती अधिकाराची माहिती मला दिलेली आहे
(७ )या माहिती अधिकारामध्ये मी डॉक्टर सूर्यकांत गीते तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या बदलीची प्रत मागितली होती तिचे चार रुपये शासकीय नियमाप्रमाणे दर भरून पावती घेतली आहे ती सोबत जोडत आहे
(8) पण यानंतर मी प्रेरणा प्रकल्प विभागात माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती सदरील माहिती मध्ये शेतकरी आत्महत्या ग्रस्त प्रेरणा प्रकल्प अतर्गत संदर्भात या माहिती अधिकाराचे माहिती अधिकारी डॉक्टर सुखदेव राठोड हेच आहेत यांनी एक पत्र दिले होते दिनांक 7/ 12 /2021 रोजीचै पत्र जे मला 29/12/2021 ला मिळाले व ते मी जिल्हा रुग्णालयातील अकाउंटंट विभागात 29 /12/2021 रोजी रोख रकमेत 134 रूपये भरले आहेत पण मला अद्यापही माहिती मिळालेली नसून माझ्याकडून 134 रुपये भरून घेतले त्या पावतीचा क्रमांकNo. 5622164असा आहे पैसे भरले असताना सुद्धा माहिती का दिली जात नाही. यामध्ये श्री महेश कदम मते डॉ मोडले हे संबंधित कर्मचाऱ्यास चौकशी केली असताना समोरासमोर किंवा फोनवर व अन्य माहिती अधिकारात चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुखदेव राठोड यांच्याकडे गेले असताना ते म्हणतात की तुम्ही अपिलात जा तुम्हाला माहिती अपिलीय अधिकारी डॉक्टर सुरेश साबळे आहेत ते देतील व अकाउंटंट म्हणून असलेले श्री केदार व औषध भांडार चे शेख एजाज आली शेख रियाज तानाजी ठाकर डॉक्टर महेश माने अशोक मते नामक सह अन्य कर्मचारी जिल्हा रुग्णालयातील जबाबदार व्यक्ती असतानासुद्धा संबंधित माहिती अधिकार अर्जावर उडवाउडवीची उत्तरे देत एकमेकांचे नाव दाखवतात
(9) बीड जिल्ह्यातील कोवीडकार्य काळामध्ये कोवीड कंत्राटी भरती कर्मचारी प्रक्रियेत डॉक्टर सुखदेव राठोड डॉक्टर बाबासाहेब ढाकणे यांनी मोठ्या प्रमाणात घोटाळा करून आर्थिक व्यवहार करून पद भरती केली होती संबंधित पदभरती करीत असताना डॉक्टर मेडिकल आॅफीससर वॉर्डबॉय j.a.m.n. a.n.am. ब्रदर सिस्टर औषध निर्माण अधिकारी इलेक्ट्रिशन लॅब टेक्नीशियन एक्स-रे टेक्निशियन विविध पदांच्या भरती प्रक्रियेत संबंधित उमेदवारांची कागदपत्राची पुर्तता नसताना सुद्धा शैक्षणिक पात्रता नसताना सुद्धा आर्थिक व्यवहाराच्या जोरावर पद भरती करून घेतली असताना संबंधित व्यवहारांमध्ये ज्या विभागांमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून निवड झाली त्या विभागांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांचे पेपरही उपलब्ध नसताना बोगस पद्धतीने भरती करून घेतली या संदर्भात ही माहिती अधिकारात माहिती मागितली पण दिली जात नाही याबाबत बीड जिल्ह्यातील सर्व दैनिक मध्ये बातम्या छापून आल्या होत्या
(10) बीड जिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन प्लांट लिक्विड प्लांट ची खरेदी करण्यात आली ती स्वताच्या एजसिला देण्यात आली यामध्ये संबंधित एजन्सीचे लायसन तपासून पेपरमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली नाही व. जास्त दर भावाने खरेदी केली यामध्ये जास्त पैसे खाल्ले संबंधित एजन्सीचे व औषध भांडार चे कर्मचारी सगमत करून कोट्यावधी ची शासनाची फसवणूक केली
(11) बोगस सॅनिटायझर साधे मास्क N95 मास्क आयव्ही स्टॅड सॅनिटायझर स्टॅन्ड फिवर गंन(12 )मॉनिटर व्हेंटिलेटर पल्स आॅक्सी मिटर बाय पॅप मशीन आॅसीजन खरेदी पलंग गादी उशी (तक्या)अंगावर पांघराची चादर बेडशीट.गायब आहेत
(13)आरटीपीसीआर लॅब साहित्य व लॅब उभारणी आरटी पिसिआर विद्युत जोडणीसह अन्य सविस्तर चौकशी करणे बाबत
(14) जंबो सिलेंडर लहान-मोठे सर्वप्रकारचे सिलेंडर सर्व प्रकारचे किती खरेदी केले व कुठे आहेत व काय किमतीत खरेदी केले (15)औषध भांडार ने ज्या कि B. M. डब्लू कॅरी बॅग p.p.e किट व्हेटी मास्क एच आय व्ही किट जिल्हा रुग्णालयातील कोविड कार्य काळामध्ये लागणाऱ्या सर्व मेडिसिन गोळ्या-औषधे व बीड जिल्हा रुग्णालयातील औषध भांडार प्रमुखांनी खरेदी केलेल्या प्रत्येक गोष्टीवर खरेदी केली त्या वस्तू
(16) प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल वस्तू पंखे बल्प पंखे कुलर एसी गरम पाणी हिटर रूम हीटर याची खरेदी करण्यात आली यासंबंधी पेपरमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली नाही व कोणी व कोणाच्या आदेशाने व कोणत्या एजन्सीच्या नावे आॅर्डर काम केले खरेदी केले व कोणाच्या नावाने संबंधित देयके अदा केली व किती देयके बाकी आहेत
(17)सर्व दवाखान्याची लाईट फिटिंग वायरिंग फरशी बांधकाम व संबंधित दवाखान्याची रिपेयरिंग वार्ड मधील सर्व फर्निचर ज्यामध्ये रॅक पलंग स्टूल टेबल कापडी पडदे प्रत्येक वार्ड मध्ये करण्यात आलेल्या केबिनसह अन्य फर्निचर,
(18) महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे फायर सिस्टिम बसवली या फायर सिस्टिमचा ऑडिट चा रिपोर्ट पूर्ण बोगस पद्धतीने बनवण्यात आलेला आहे व माहिती अधिकार अर्जावर मागितला तर दिला जात नाही तर फायर सिस्टीम ही अर्ध्यातच करून पूर्ण रक्कम उचललेली आहे फायर सिस्टीम चे काम कोणत्या एजन्सीला दिले व कोणाच्या आदेशाने दिले व कोणत्या एजन्सीच्या नावे देयके अदा केली आणि किती देयके बाकी आहे व संबंधित कामांसाठी खर्च किती आला याचे दर किती होते (19) मध्ये प्रामुख्याने सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे यांच्या विविध प्रकारच्या घोटाळ्यांमध्ये विद्यमान आर एम ओ डॉक्टर सुखदेव राठोड यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला असून या भ्रष्टाचारामध्ये रक्तपेढी प्रमुख तथा rt-pcr यांच्या प्रमुख डॉक्टर रोहिणी बांगर व त्यांचा भाऊ गणेश बांगर बडतर्फ कर्मचारी राजरतन जायभाय सह तत्कालीन औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे विद्यमान भांडा प्रमुख तानाजी ठाकर शेख एजाज आली शेख रियाज हे या घटनेचे मुख्य सूत्रधार आहेत तर हेच या 110 कोटी रुपयाच्या खरेदी मध्ये सहभागी होऊन स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावे बोगस पद्धतीने काढून बोगस पद्धतीने संबंधित खरेदीची देयके कोट्यावधी रुपयाची स्वतःचे एजन्सी नावे काढण्यात आले आहेत
(20) यामध्ये संबंधित एजन्सीच्या नावाने उर्वरित जी रक्कम आहे अंदाजित रक्कम 40 कोटी रुपये येणाऱ्या काळामध्ये रक्कम देयके अदा करणार आहेत सदर रक्कम ही बोगस पद्धतीने खरेदी करण्यात आलेल्या साहित्य काळातील चौकशी करूनच देण्यात यावी जेणेकरून110 कोटी रुपये मध्ये खरेदी करण्यात आलेल्या कागदोपत्री साहित्यावर जवळपास अंदाजे 25 ते 40 कोटी रुपये जिल्हा रुग्णालयाकडून देणे बाकी आहे आज पर्यंत जिल्हा रुग्णालयात अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासन तर्फे जिल्हाधिकारी नियोजन यांच्याकडून 110 कोटी ते तीनशे कोटी पर्यंत देण्यात आलेला आहे तरी संबंधित एजन्सीच्या नावे संबंधित कार्यकाळात खरेदी करण्यात आलेल्या बोगस खरेदी संबंधित एजन्सीचे लायसन तपासून त्याची उर्वरित देयके अदा करू नये हि विनंती (21)कोविड कार्य काळामध्ये रेमडेसिव्हर इंजेक्शन कोवीड काळातील साहित्य खरेदीचे मुख्य सूत्रधार डॉक्टर सुखदेव राठोड आदिनाथ मुंडे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक सूर्यकांत गीते तत्कालीन औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे शेख एजाज आली शेख रियाज तानाजी ठाकर यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत व यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे
(21) यामध्ये संबंधित माहिती मागायला गेलो असता खोट्या गुन्ह्यांमध्ये शासकीय कामात अडथळा ,व महिलेच्या विनयभंगासारख्या गंभीर गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात संबंधित माहिती अधिकाराची माहिती का देत नाहीत
( 22)
याची आपण पालक मंत्री व जिल्हाधिकारी या नात्याने चौकशीचे आदेश देऊन संबंधित बीड जिल्ह्यातील गोरगरिबांचा घास पळवणार्‍या दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर ती कारवाई करावी ही नम्र विनंती
(23) या ठिकाणी प्रामुख्याने डॉक्टर सुखदेव राठोड म्हणतात की जा परळीला वाल्मीक आन्ना कराड यांची भेट घे ही सगळी खरेदी वाल्मीक अण्णानी केली आहे सत्तेत जे लोक आहेत तेच गुतेदार आहेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांचीच खरेदी आहे अस डॉ सुखदेव राठोड तोंडी सागतात तर यामध्ये तानाजी ठाकर हासुद्धा वाल्मीक आन्ना यांचे सदैव नाव सांगत असतो मी वाल्मीक आन्ना यांचे नाव ऐकून आहे पण आज पर्यंत कधीही संबंध आलेला नाही (24)तर वाल्मीक आन्ना यांनीच रेमडेसिव्हर इंजेक्शन हे सर्व इंजेक्शन खाजगी रुग्णालयात कार्यकर्त्या देण्यास सांगितले होते व संबंधित औषध भांडार च्या रजिस्टरला रेमडेसिव्हर इंजेक्शनची नोंद ही इंजेक्शन देताना स्टोर ला मोठ्या प्रमाणात रजिस्टर वरती खाडाखोड आहे व याठिकाणी पालकमंत्री यांच्या तोंडी आदेशाने किंवा मोबाइल वरती फोन आल्यानंतर असा लेखी उल्लेख करण्यात आलेला आहे संबंधित औषध भांडार मध्ये रेमडेसिव्हर इंजेक्शन हे पालकमंत्र्यांच्या तोंडी आदेशानुसार व जिल्हाधिकारी यांच्या तोंडी आदेशानुसार इंजेक्शन दिल्याची नोंद जिल्हा रुग्णालयातील रजिस्टर ला आहे तर यामध्ये पालकमंत्री या नात्याने आपली खूप बदनामी होत आहे (25)संबंधित रजिस्टर ची व औषध भांडार ची साहित्य खरेदी ची 110 कोटी रुपयांपेक्षाही जास्त खरेदी या ठिकाणी झालेली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ता या नात्याने माहिती मागितलेली असताना सुद्धा माहिती दिली जात नाही संबंधित सर्व माहिती अधिकार यांची एकूण संख्या 15 असून गेल्या आठ ते दहा महिन्यांमध्ये हे माहितीचा अधिकार मी रीतसर जिल्हा रुग्णालयात आवक-जावक विभागामध्ये अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा आजी-माजी जिल्हा चिकित्सक यांना माहिती अधिकारात माहिती मागितली पण देत नाहीत संबंधित माहिती अधिकाराच्या झेरॉक्स प्रत सोबत जोडत आहे तरी माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब बीड जिल्हाधिकारी साहेब यांना कळकळीची विनंती आहे कि येणाऱ्या काळामध्ये कोवीड साहित्य खरेदीची सुमारे 40 कोटी रुपयाची बाकी देण्यात येऊ नये बीड कोवीड कार्यकाळातील साहित्य खरेदीची देयके संबंधित एजन्सीला अदा करण्यात येऊ नये कारण एजन्सी सुद्धा बोगस नावाने आहेत व अवाच्या सवा भाव लावण्यात आलेले आहेत खरेदी करीत असताना यामध्ये विशेषतः जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सह अन्य कर्मचारी स्वतः गुत्तेदार बनले आहेत
(26) संबंधित रेमडेसिव्हर इंजेक्शनची तक्रारप्रकरणी रेमडेसिव्हर इंजेक्शन संबंधित चौकशीही बीड शहर पोलीस स्टेशन येथे 24 /4 2/021 ला लेखी अर्ज दिला होता संबंधित इंजेक्शन संदर्भात बीड शहर पोलिसांनी चौकशी न करताच परस्पर अर्ज प्रकरण निकाली काढले म्हणून मी पोलीस उपाधीक्षक यांना 13/9/21 रोजी अर्ज दिला आहे या रेमडेसिव्हर इंजेक्शन प्रकरणी माझ्या अर्जावरती पोलीस उपाधीक्षक बीड हे तपास करीत असून संबंधित इंजेक्शन प्रकरणी बीड जिल्हा रुग्णालय रजिस्टर वरती रेमडेसिव्हर इंजेक्शन कसे दिले याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की जिल्हा रुग्णालयातील सब स्टोअरला रजिस्टर वरती दीप हॉस्पिटल येथील लेटर पॅड वर सेतु हातागळे या पेशंटच्या नावे चार रेमडेसिव्हर इंजेक्शन दिले गेले हे पेशंट अस्तित्वात नसताना सेतू हातागळे नावाचा व्यक्ती अस्तित्वात नाही या व्यक्तीच्या नावे पेशंट ऍडमिट नसताना आधार कार्ड ओळखपत्र कसल्याही प्रकारची फाईल दीप हॉस्पिटल या ठिकाणी नसताना बीड जिल्हा रुग्णालयाच्या रजिस्टरला नोंद आहे संबंधित दीप हॉस्पिटलच्या लेटरपॅडवर ती एका इंजेक्शनची मागणी असताना चार इंजेक्शन कसे दिले व संबंधित जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते यांच्या नावे असलेल्या दीप हॉस्पिटल च्या लेटर पॅड वरती चार रेमडेसिव्हर इंजेक्शन हे चुकीच्या नावाने व बोगस पद्धतीने दिले गेल्याचे निष्पन्न होत आहे विशेषतः एका इंजेक्शनमागणी असताना चार इंजेक्शन हे कोणी दिले व कोणाच्या आदेशाने दिले याला महत्त्व आहे सर्व अधिकार जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा अतिरिक्त शल्यचिकित्सक यांनाच आहेत पण डॉक्टर गीते डॉक्टर राठोड यांच्या सहीने न देता संबंधी इंजेक्शन न देता 2+2 असा उल्लेख संबंधित दिप हॉस्पिटलच्या लेटरपॅडवर केलेला आहे यामध्ये तत्कालीन औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे यांनी स्वतःची सही करून बोगस पद्धतीने इंजेक्शन दिल्याचे उघड आहे आदिनाथ मुंढे यांनी पदाचा गैरवापर केल्यामुळे बीड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतआहेत तर याठिकाणी सध्या पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे हे प्रकरणी तपास चालू आहे यामध्ये आपण लक्ष घालून पालकमंत्री आरोग्य मंत्री जिल्हाधिकारी या नात्याने चौकशी करून गुन्हे दाखल करावेत असे आदेश द्यावेत व सर्वसामान्यांना न्याय द्यावा ही विनंती
(27) बीड जिल्हा रुग्णालयातील रेमडेसिव्हर इंजेक्शन व बीड जिल्हा रुग्णालयातील कोवीड कार्य काळातील खर्चाचे आॅडिट तपासणी करण्यात यावी
(28) संबंधित वरील विषयी मी गेले दहा ते अकरा महिन्यांपासून बीड जिल्हाधिकारी साहेब व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हा रुग्णालय आरोग्य प्रशासन पोलीस प्रशासन याचे कडे लेखी पाठपुरावा करत आहे व सोबतच बीड सहकार्य महाराष्ट्र राज्यतील पेपरमध्ये व टिव्ही चैनलवर बातम्या प्रकाशित झाल्या आहेत व त्यासंबंधी छायाकित प्रतीत सोबत जोडत आहे तसेच लवकरच मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून उच्च न्यायालय औरंगाबाद मध्ये कोवीड साहित्य व बोगस 110कोटीची खरेदी रेमडेसिव्हर इंजेक्शनसह काळाबाजार प्रकरणी याचिका दाखल करणार आहे.
सोबत आरोग्य सहसंचालक आंतरराष्ट्रीय अभियान मुंबई याचे रेमडेसिव्हर इंजेक्शन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी चे आदेशाची प्रत माहिती अधिकार अर्जाची व सर्व निवेदन व तक्रारीची झेरॉक्स प्रत जोडत आहे
(29) रेमडेसिव्हर इंजेक्शन बोगस पद्धतीने दिप हॉस्पिटलच्या लेटरपॅडवर दिलेल्या इंजेक्शन प्रकरणी 24/4/2021/रोजी बीड शहर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे पण गुन्हा का दाखल होत नाही व पोलीस उपअधीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे 13/9/2021ला रेमडेसिव्हर इंजेक्शन प्रकरणी चौकशी सुरू आहे यांत दोषींवर कारवाई करावी व गुन्हा दाखल करण्यात यावा.
(30) मुख्य सुत्रधार विद्यमान अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीतसक डॉ.सुखदेव राठोड तत्कालीन जिल्हा शल्यचिकीतसक डॉ.सुर्यकांत गिते तत्कालीन औषध भांडार प्रमुख आदिनाथ मुंडे विद्यमान औषध भांडार प्रमुख तानाजी ठाकर, शेख रियाज, शेख ऐजाज यांनी रक्तपेडी प्रमुख डॉ.जयश्री बांगर रक्तपेडी कर्मचारी गणेश बांगर बडतर्फ औषध भांडार प्रमुख राजरतन जायभाये यांनी वरील कर्मचारी हे ऐकमेकांचे नातेवाईक आहेत हे या पदावर येण्याच्या आगोदर व आताची मालमत्ता यांच्या नावाने व त्यांचे नातेवाईकांचे नावावर असलेली मालमत्तेची चौकशी करावी. या मध्ये महाराष्टातील जिल्ह्यात जमिन, प्लॉट, फ्लॉट महागड्या चार चाकी वहान इत्यादी भ्रष्टाचारचा काळा पैसा सुमारे 110 कोटी रुपयेचे कोव्हीड साहित्य खरेदी व कोव्हीड कार्यकाळामध्ये दिनांक 01/01/2019 ते दिनांक 18/11/2021 रोजी पर्यंत सुमारे 285 कोटी रुपयाची अफरा तरफ संबंधीत व्यक्तीने केलेली आहे. म्हणुन मी आपल्या कडे माझी तक्रार आहे. हि नम्र विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here