गोपाळ आंधळे यांच्याकडुन वाल्मीकअण्णा कराड यांचा तुळजाभवानीची प्रतिमा देवुन सत्कार

परळी : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे साहेब यांचे खंदे शिलेदार न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त येडशी ते तुळजापुर पायी दिंडी काढत ही दिंडी परळीत आल्यानंतर शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी वाल्मीकअण्णांचा वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला दि.27 रोजी तुळजाभवानीची प्रतिमा भेट देत तुळजापुर येथील प्रसाद देवुन सत्कार केला यावेळी दिंडीतील सहकार्यासह कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.
न.प.गटनेते वाल्मीकअण्णा कराड कराड यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी येडशी ते तुळजापुर अशी पायी दिंडी काढत वाल्मीकअण्णांच्या उदंड आयुष्यासाठी तुळजाभवानीची  पुजा व गोंधळ कार्यक्रम करत साकडे घातल्यानंतर तुळजाभवानीच्या दरबारातुन घेतलेली प्रतिमा तसेच प्रसाद वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला गुरुवार दि.27 रोजी जगमित्र कार्यालयात शाल,श्रीफळ,फेटा बांधून तुळजाभवानीची प्रतिमा व महाप्रसाद देत सत्कार करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी पायी दिंडीत सहभागी हनुमान आगरकर,अर्जुन साखरे,सोमनाथ आंधळे, टाक मामा ,विजय पोखरकर, नामदेव पाथरकर  यांच्यासह पत्रकार संजय खाकरे,धनंजय आढाव,दत्तात्रय काळे,धीरज जंगले,महादेव गित्ते,बालासाहेब फड,अभिमान मस्के,रामेश्वर महाराज कोकाटे,महादेव शिंदे,  रवी मुळे, माऊली मुंडे,  आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here