कृषी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा, अजय धोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न

 

बीड : आष्टी येथील कृषी महाविद्यालय ,इंजिनीअरिंग कॉलेज ( पॉलटेक्निक कॉलेज ) , अन्नतंत्र महाविद्यालय (फुड टेक्नॉलॉजी) , डि फार्मसी कॉलेज , बी फार्मसी कॉलेज , महेश आयुवेर्दिक महाविद्यालय व रुग्णालय, नर्शिंग कॉलेज ,कृषी तंत्रनिकेतन , पशुसंवर्धन कॉलेज, महेश पॅरामेडीकल कॉलेज यांच्या संयुक्त कृषी महाविद्यालयात 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या वेळी संस्थेचे संचालक तथा भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस अजय (दादा) धोंडे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाला . ध्वजारोहन झाल्या नंतर कृषी महाविद्यालया च्या विद्यार्थीनींनी उत्कृष्ट असे देशभक्ती पर गित गायले .ध्वजारोहन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भिमरावजी धोंडे , जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, मा .राजेन्द्र धोंडे ,प्रा. नवनाथ अनारशे ,युवा नेते अभयराजे धोंडे, शिवाजी थोरवे,प्रशासन अधिकारी डॉ डी बी राऊत, दत्तात्रय गिलचे, शिवदास विधाते, माऊली बोडखे, संजय शेंडे, कृषी महाविद्यालय प्राचार्य आरसुळ एस आर, बी फार्मसी व डी फार्मसी कॉलेज चे प्राचार्य सुनिल कोल्हे, इंजिनीरिंग चे प्राचार्य संजय बोडखे, अन्नतंत्र कॉलेज चे प्राचार्य साईनाथ मोहळकर , महेश आयुवेर्दिक महाविद्यालय व रुग्णालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत गोसावी, कृषी तंत्रनिकेतन चे प्राचार्य घुले सर , नर्शिंग चे प्राचार्य सलमान खान ,व सर्व कॉलेज चे प्राध्यापक, प्राध्यापिका व कर्मचारी या वेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मिसाळ एल एस यांनी केले तर आभार प्राचार्य आरसूळ एस आर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here