प्रजासत्ताक दिनाच्या ७३ वर्धापनदिनानिमित्त सामाजिक न्याय मंत्र्यांच्या जिल्ह्य़ात पतीच्या मृत्युप्रकरणात कारवाईसाठी स्मशानभुमीत आमरण उपोषण

प्रजासत्ताक दिनाच्या ७३ वर्धापनदिनानिमित्त सामाजिक न्याय मंत्र्यांच्या जिल्ह्य़ात पतीच्या मृत्युप्रकरणात कारवाईसाठी स्मशानभुमीत आमरण उपोषणाची वेळ;भ्रष्टाचार निर्मूलन समितीची मुख्यमंत्री,गृहमंत्री, जलसंधारण मंत्री, विभागीय आयुक्तांना तक्रार
____
२६ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री धनंजय मुंढे ७३ व्या प्रजासत्ताक दिनी वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहन करत असताना त्यांच्याच जिल्ह्यात बीड तालुक्यातील पाली येथील श्रीमती तारामती अर्जुन साळुंके आपल्या पतीच्या आत्मदहनास कारणीभूत प्रशासनातील आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी, दाखल गुन्हा परत घेण्यात यावा यासाठी ज्या स्मशानभुमीत पतीचा अंत्यविधी झाला त्याच स्मशानभुमीत आमरण उपोषणास बसल्या असुन संबधित प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती शेख युनुस च-हाटकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, जलसंधारण मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना तक्रार केली आहे.

सविस्तर माहीती
____
श्रीमती तारामती अर्जुन सोळुंके यांचे पती मयत अर्जुन कुंडलिक सोळुंके रा.पाली ता.जि.बीड यांनी दि.२४ नोव्हेंबर २०२० रोजी पाटबंधारे विभाग आणि जिल्हाप्रशासनातील आधिका-यां मानसिक छळास कंटाळुन पाटबंधारे विभागाच्या आवारात जाळुन घेऊन आत्मदहन केले होते त्यातच त्यांचा मृत्यु झाला होता संबधित प्रकरणात शिवाजीनगर पोलीस स्टेशन ता.जि.बीड येथे गुन्हा र.नं.४३९/२०२० कलम ३०६,३४ भादवि नुसार गुन्हा दाखल असून संबधित प्रकरणात कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग संपादित संघ आणि तत्कालीन उपजिल्हाधिकारी भु-संपादन विभाग बीड, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संबधित प्रकरणात उपविभागीय आधिकारी नामदेव टीळेकर, कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे, भुमिअभिलेख उपअधिक्षक कापसे श्रीमती तारामती अर्जुन साळुंके यांच्यावर दाखल केलेला गुन्हा परत घेण्याचा दबाव आणत असुन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी
तसेच
पोलीस प्रशासनातील आधिकारी तांत्रिक कारणे देत कारवाई करण्यास दिरंगाई करत असून संबधित प्रकरणात जलदगतीने पोलीस प्रशासनातील आधिका-यांनी पुरावे सादर करून आरोपींना अटक करण्यात यावी.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांनी राजीनामा द्यावा
_____
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंढे यांच्या जिल्ह्य़ातील विविध विभागातील भ्रष्टाचार प्रकरणात प्रशासनावर अंकुश ठेवता येत नसेल, भ्रष्ट आधिका-यांवर कारवाई करता येत नसेल आणि पतीच्या मृत्युस कारणीभूत प्रशासनातील आधिका-यांवर कारवाई करण्यासाठी महिलेला न्याय मिळवण्यासाठी स्मशानभुमीत आमरण उपोषण करण्याची वेळ येत असेल तर त्यांनी सामाजिक न्याय मंत्री पदाचा राजीनामा द्यावा कारण बीड जिल्ह्य़ातील नागरीकांनाच न्याय देऊ शकत नसतील तर ईतरांचं काय???

महिला आयोग सदस्य अड.संगीताताई चव्हाण यांनी न्याय द्यावा ;अध्यक्ष राज्य महिला आयोग यांना तक्रार:-डाॅ.गणेश ढवळे
____
दोन दिवसापुर्वी बीड जिल्ह्य़ातील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अड. संगीता ताई चव्हाण यांची महिला आयोग सदस्य महाराष्ट्र राज्य पदी निवड झाली असून संबधित प्रकरणात त्यांनी तारामती सोळुंके यांना न्याय द्यावा संबधित प्रकरणात अध्यक्ष राज्य महिला आयोग यांना तक्रार करण्यात आली आहे.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.८१८०९२७५७२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here