पुणे

अनेक वर्षे पुण्याचा पालकमंत्री होतो, आजवर पुण्यात झेंडावंदन..’, अजित पवारांची ध्वजारोहणाबद्दल पहिली प्रतिक्रिया


यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणावरुन सध्या राजकारण सुरु आहे. पुण्यातील ध्वजारोहण राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे. पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी अजित पवार इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

त्यामुळे पुण्यात कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र ध्वजारोहणाची यादी जाहीर झाली आणि ध्वजारोहणाचा तिढा सुटला होता. मात्र याच यादीवर हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि अजित पवारांनी नाराज व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुण्यात रमेश बैस ध्वजारोहण करतील, असं सांगण्यात आलं आहे.

त्यावर अजित पवारांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील या दोन्ही नेत्यांपैकी कुणालाही नाराज करू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्याचं अजित पवार यांनी खंडन केलं आहे. मी अनेक वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. आपल्याकडे अनेक वर्षापासून 15 ऑगस्टचं झेंडा वंदन राज्यपालच करतात. इथे कधीही 15 ऑगस्टचं झेंडा वंदन पालकमंत्री करत नाहीत’, असं अजित पवार म्हणाले आहेत.

Maharashtra Politics: शिवसेना खासदारांच्या मतदारसंघावर अजितदादांचा डोळा? आगामी लोकसभेसाठी मोठी खेळी
‘1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं ध्वजारोहण पालकमंत्री करतात. 26 जानेवारीचं ध्वजारोहण पालकमंत्री करतात. 26 जानेवारीला पुण्यात मी ध्वजारोहण केलं. गिरीश बापटांनी केलं. चंद्रकांत पाटील यांनीही केलं. पण तुम्ही लगेच उलट्या बातम्या चालवल्या. क्षुल्लक कारणांचा बाऊ केला. तुम्ही माहिती घ्या, असंही अजित पवार पुढे म्हणाले आहेत.

Eknath Shinde: पुण्यातील चांदणी चौक लोकार्पण समारंभाला मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी? राजकीय चर्चांना उधाण
तर पुढे ते म्हणाले की, ‘वर्षानुवर्षाची परंपरा आहे. ती जाणून घ्या. कुणाला कुठे ध्वजारोहण करण्याची जबाबदारी द्यावी हा राज्याच्या प्रमुखांचा अधिकार आहे. वेगवेळ्या मंत्र्यांना झेंडा वंदनाची जबाबदारी देण्यात आली आहे. माहिती घ्यायची नाही, रुसवे, फुगवे सांगतात. कुणाचा रुसवा आणि कुणाचा फुगवा? कुणी तुम्हाला रुसून सांगितलं. कुणी फुगून सांगितलं. चुकीच्या बातम्या देऊ नका, असं आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केलं आहे.

अजित पवार अन् एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर? अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या नाराजीबद्दल स्पष्टच सांगितलं


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *