राणेंच्या घरात घुसून नीतेश राणेंना पालथा घालून तुडवावा – सुषमा अंधारे

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

सुषमा अंधारे म्हणाल्या की, तुम्ही सावरकरांचा अपमान करताय असे आता म्हणणारे राणे यांनी २०१५ मध्ये सावरकरांनी माफी मागितली होती, असे ट्विट केले होते.त्यावर अंधारे म्हणाल्या की, भाजपने कणकणवलीमध्ये जात राणेंच्या घरात घुसून आंदोलन करावे आणि नीतेश राणेंना बाहेर काढत पालथा घालून तुडवावा

नीतेश राणे यांनी २०१५ मध्ये सावरकरांच्या विरोधात ट्विट केले होते. आता भाजपमध्ये आल्यावर सावरकरांवरून बोलणारे शेंड्यावरून शहाणे झालेले बोलायला लागले की, असे नाही बोलायचे तसे नाही बोलायचे, भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नारायण राणेंच्या कणकवलीमधील घरी जात आंदोलन करावे, असे आव्हान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. ​​​​​​

सुषमा अंधारे म्हणाल्या की, तुम्ही सावरकरांचा अपमान करताय असे आता म्हणणारे राणे यांनी २०१५ मध्ये सावरकरांनी माफी मागितली होती, असे ट्विट केले होते. त्यावर अंधारे म्हणाल्या की, भाजपने कणकणवलीमध्ये जात राणेंच्या घरात घुसून आंदोलन करावे आणि नीतेश राणेंना बाहेर काढत पालथा घालून तुडवावा. मग आम्ही मानू, असे अंधारेंनी म्हटले आहे. तर आम्हाला शहाणपणा सांगू नये असे म्हणत नीतेश राणेंना टोला लगावला आहे. ‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों पर पत्थर नहीं फ़ेंका करते, हे लक्षात असेलच देवेंद्र फडणवीस यांना असा टोला ही शायरीच्या माध्यमातून लगावला आहे.

औरंगाबादमधील ५ आमदार गेले, पण जनता ही बाळासाहेबांच्या सोबतच आहे. ज्या झाडाच्या खाली बसले त्यांच झाडाच्या मुळावर घाव घालायला निघाले आहे. जैस्वाल यांच्या संपत्ती विरोधात कायदेशीर कारवाई करणार असे म्हणतांना जैस्वाल असो की शिरसाट असो एकही जण पुन्हा निवडून येणार नाही, असे म्हणताना अंधारेंनी टीकास्त्र डागले आहे.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here